Stock Market Crash: मोदींच्या आवाहनानंतर शेअर बाजारात मोठा भूकंप! सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदार चिंतेत

Stock Market Today: पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि FIIs च्या जोरदार विक्रीमुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
Stock Market Crash
Stock Market CrashPudhari
Published on
Updated on

Stock Market Crash Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराला मोठा धक्का बसला. आज बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 800 अंकांनी घसरला, तर निफ्टी 24,000 च्या खाली आला. पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीतील मोठी वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांची (FIIs) जोरदार विक्री यामुळे बाजारावर मोठा दबाव दिसून आला.

मिडल ईस्टमधील तणावामुळे जागतिक बाजारात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. सकाळी GIFT Nifty 200 हून अधिक अंकांनी घसरून 24,024 च्या आसपास व्यवहार करताना दिसला. अमेरिकन बाजाराचा अंदाज देणाऱ्या Dow Futures मध्येही घसरण दिसून आली.

मोदींचं परकीय चलन वाचवण्याचं आवाहन

या घडामोडींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अलीकडील आवाहनही चर्चेचा विषय ठरत आहे. वाढत्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं, एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचं आणि शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होमचा अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनं स्वीकारण्यावर आणि अनावश्यक परदेशी प्रवास टाळण्यावरही त्यांनी भर दिला.

ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळला

मिडल ईस्टमधील युद्धजन्य परिस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळल्याने जागतिक गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, इराणचा प्रस्ताव त्यांना मान्य नाही. या वक्तव्यानंतर जागतिक बाजारात तणाव आणखी वाढल्याचं दिसून आलं.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ

मिडल ईस्ट तणावाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या बाजारावर झाला आहे. ब्रेंट क्रूडच्या किमती जवळपास 4 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 105 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. भारतासारख्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे. तेल महागल्याने महागाई वाढू शकते आणि देशाच्या चालू खात्यावरील ताणही वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकन बाजारात मात्र तेजी कायम

एकीकडे जागतिक तणाव वाढत असताना, दुसरीकडे अमेरिकन शेअर बाजारात टेक कंपन्यांच्या शेअर्समुळे तेजी कायम आहे. Nasdaq सुमारे 450 अंकांनी वाढून नव्या उच्चांकावर बंद झाला. S&P 500 नेदेखील सर्वकालीन उच्चांक गाठला. मात्र Dow Jones मध्ये दिवसभर चढ-उतार दिसून आले आणि शेवटी तो किरकोळ वाढीसह बंद झाला.

Stock Market Crash
PM Modi Appeal: देश आर्थिक संकटात? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय काय सांगितलं? A to Z माहिती जाणून घ्या

सोने-चांदीच्या किमतीतही वाढ

जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. चांदी जवळपास 3,400 रुपयांनी वाढून 2.62 लाख रुपयांच्या आसपास पोहोचली, तर सोन्याचा भाव सुमारे 300 रुपयांनी वाढून 1.52 लाख रुपयांच्या वर बंद झाला.

FIIs ची मोठी विक्री सुरूच

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. FIIs ने सलग चौथ्या दिवशी कॅश मार्केटमध्ये सुमारे 4,100 कोटी रुपयांची विक्री केली. एकूण नेट विक्री जवळपास 10,580 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DIIs) सलग 11 व्या दिवशी खरेदी करताना दिसले आणि त्यांनी सुमारे 6,750 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

Stock Market Crash
RCB IPL Champion: RCB पुन्हा IPL चॅम्पियन होणार? 10 वर्षांनंतर भुवीचा कमाल योगायोग; 2016 ला काय घडलं होतं?

निकाल जाहीर करणाऱ्या कंपन्यांवर नजर

तिमाही निकालांच्या मोर्चावरही काही कंपन्या चर्चेत राहिल्या. Tata Consumer, Bank of India आणि Bank of Baroda यांनी दमदार निकाल सादर केले. Oberoi Realty आणि Swiggy चे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले ठरले. मात्र ABB India चं प्रदर्शन कमकुवत मानलं जात आहे. आज Canara Bank, Indian Hotels, Nuvama Wealth Management, UPL आणि JSW Energy यांच्या निकालांवर गुंतवणूकदारांचं लक्ष असणार आहे.

Vodafone Idea संदर्भात मोठी बातमी

Vodafone Idea च्या आर्थिक स्थितीबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, Vodafone Plc आपल्या काही हिस्सेदारीचे ट्रेझरी शेअर्स Vodafone Idea कडे हस्तांतरित करू शकते. यामुळे कंपनीला निधी उभारण्यात मदत होऊ शकते आणि तिची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news