Stock Market Today: सेन्सेक्स 2,000 अंकांनी कोसळला, निफ्टी 23,900 च्या खाली, शेअर बाजर लाल रंगात

Stock Market Today: मध्यपूर्वेतील युद्धजन्य तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती 110 डॉलरच्या वर गेल्या. याचा परिणाम जागतिक बाजारांसह भारतीय शेअर बाजारावर झाला आणि सेन्सेक्स 2000 अंकांनी घसरला.
Stock Market
Stock MarketPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: मध्यपूर्वेत वाढलेल्या युद्धजन्य तणावाचा फटका आता जागतिक अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. इराण-इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्ष तीव्र होत असताना कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक शेअर बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळाली.

आज सकाळी बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्यामुळे सेन्सेक्स जवळपास 2,000 अंकांनी घसरला, तर निफ्टी सुमारे 500 अंकांनी खाली येत 23,900 च्या खाली घसरला. बँक निफ्टीमध्येही सुमारे 2,100 अंकांची मोठी घसरण झाली. जागतिक घडामोडींमुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ

मध्यपूर्वेत वाढत्या तणावामुळे तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये जवळपास 20 टक्क्यांची वाढ झाली आणि त्या 110 डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचल्या. जून 2022 नंतर प्रथमच तेलाच्या किमती इतक्या वाढल्या आहेत.

Stock Market
India Russian Oil Imports: रशियन तेलावरून नवा वाद! भारताला अमेरिकेची खरचं परवानगी घ्यावी लागते का?

हॉर्मुज सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहतुकीवर परिणाम झाल्यानंतर कुवैतने उत्पादनात मोठी कपात केली आहे. त्याचबरोबर संयुक्त अरब अमिराती आणि इराक यांनीही उत्पादन कमी केल्याची माहिती समोर आली आहे. पुरवठा कमी होण्याची भीती वाढत असताना कतारच्या ऊर्जा मंत्र्यांनी इशारा दिला आहे की, युद्ध थांबले नाही तर कच्च्या तेलाच्या किमती 150 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात.

आशियाई बाजारातही मोठी घसरण

तेलाच्या किमतीतील वाढ आणि भू-राजकीय तणावामुळे आशियातील शेअर बाजारही दबावाखाली आहेत. जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारांमध्ये 7 ते 8 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. याचा परिणाम भारताच्या बाजारावरही झाला.

गिफ्ट निफ्टी जवळपास 800 अंकांनी घसरून 23,800 च्या खाली आला, ज्यामुळे भारतीय बाजाराला मोठ्या घसरणीचे संकेत आधीच मिळाले होते. अमेरिकेच्या बाजारातील फ्युचर्समध्येही दबाव दिसून आला आणि डाओ फ्युचर्समध्ये सुमारे 900 अंकांची घसरण झाली.

Stock Market
PM Kisan 22nd Installment: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार? अपडेट जाणून घ्या

परदेशी गुंतवणूकदारांची विक्री वाढली

भारतीय शेअर बाजारातील घसरणीमागे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) विक्रीही कारणीभूत ठरली आहे. शुक्रवारी परदेशी गुंतवणूकदारांनी रोख बाजार, इंडेक्स फ्युचर्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून सुमारे 9,459 कोटी रुपयांची विक्री केली. सलग सहाव्या दिवशी त्यांनी विक्री केली आहे. मात्र देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) काही प्रमाणात बाजाराला आधार दिला. त्यांनी सलग आठव्या दिवशी जवळपास 6,972 कोटी रुपयांची खरेदी केली.

इस्रायल-इराण संघर्षामुळे तणाव वाढला

दरम्यान, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. इस्रायलने तेहरानमधील एका तेल केंद्रावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना इराणने खाडी देशांवर हल्ला केल्याबद्दल खेद व्यक्त केला असला तरी त्याने इशारा दिला आहे की, जर त्यांच्या विरोधात गेलात तर ते प्रत्युत्तर देतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news