Stock Market Crash: शेअर बाजार पुन्हा कोसळला; सेन्सेक्स 615 अंकांनी खाली, कोणते शेअर्स घसरले?

Stock Market Crash: आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स 615 अंकांनी घसरला आणि निफ्टी 25,400च्या खाली आला. झोमॅटो, रिलायन्स, सन फार्मा, इंडिगो, टीसीएस आणि इन्फोसिससारख्या मोठ्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Crash: शेअर बाजारात आज मोठी घसरण दिसून आली. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात विक्रीचा जोर वाढल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. बीएसई सेन्सेक्स 615 अंकांनी घसरून 82,630 वर व्यवहार करत होता.

तर निफ्टी 218 अंकांनी घसरून 25,368 वर आला. याचबरोबर बँक निफ्टीही 325 अंकांनी खाली घसरला. काल बाजारात मोठी पडझड झाली होती आणि मंगळवारीसुद्धा त्याच गतीने घसरण सुरू राहिल्याने बाजारात भीतीचे वातावरण तयार झाले.

कोणते शेअर्स घसरले?

आज बाजारात फारच कमी शेअर्समध्ये तेजी होती. ICICI बँक, HDFC बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि कोटक महिंद्रा बँक या काही शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसली. मात्र बाकी बहुतेक शेअर्स जोरात घसरले. बीएसईच्या टॉप-30 पैकी 26 शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली.

बाजारातील घसरणीचा सर्वाधिक फटका झोमॅटो, सन फार्मा, इंडिगो आणि रिलायन्स या शेअर्सना बसला. त्यानंतर टायटन, टीसीएस, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टेक महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्सही घसरले.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण

घसरणीचा परिणाम केवळ मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित नव्हता. मिडकॅपमध्ये ओबेरॉय रिअॅल्टीचे शेअर्स 8.63% घसरले. UPL 7.78% खाली, तर Voltas चे शेअर्स 4% पेक्षा जास्त घसरले. स्मॉलकॅपमध्येही मोठी पडझड झाली. Data Patterns 9% घसरले, तर Ola Electric 8% खाली आले.

कोणते सेक्टर सर्वाधिक घसरले?

आज जवळपास सर्वच सेक्टरमध्ये घसरण दिसली. रिअॅल्टी सेक्टरमध्ये 4% पेक्षा जास्त घसरण झाली, तर केमिकल सेक्टर 2.39% नी खाली आला. याशिवाय फायनान्शियल सर्व्हिसेस, कन्झ्युमर, ऑईल अँड गॅस अशा महत्त्वाच्या सेक्टरमध्येही शेअर्स ‘रेड झोन’मध्ये व्यवहार करत होते.

Stock Market Today
Uddhav-Raj Thackeray: ठाकरे बंधूंची तोफ पुन्हा धडाडणार; 23 जानेवारीला एकाच व्यासपीठावर, काय आहे कारण?

584 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर

आज एकूण 4,288 ॲक्टिव्ह शेअर्सपैकी—

  • 799 शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते

  • 3,338 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते

  • 151 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही

आज 60 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर होते, तर 584 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. याशिवाय 119 शेअर्सना अपर सर्किट, तर 225 शेअर्सना लोअर सर्किट लागले.

Stock Market Today
Amit Thackeray: 'नगरसेवक बेपत्ता आहेत का?' फाईव्ह स्टार हॉटेलमधील राजकारणावर अमित ठाकरेंची जोरदार टीका

सलग दोन दिवसांची ही जोरदार घसरण पाहता बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. मोठ्या कंपन्यांसह मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्री वाढल्याने गुंतवणूकदार सध्या अधिक सावध झाल्याचं दिसून येतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news