

Stock Market Closing Updates
आयटी (IT) आणि एफएमसीजी (FMCG) शेअर्समधील जोरदार विक्रीमुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी (दि.२४ जुलै) घसरला. सेन्सेक्स ५४२ अंकांनी घसरून ८२,१८४ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १५७ अंकांच्या घसरणीसह २५,०६२ वर स्थिरावला. तर PSU बँक शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
सेन्सेक्सवर ट्रेंटचा शेअर्स ३.९ टक्के घसरला. टेक महिंद्राचा शेअही ३ टक्के खाली आला. बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, एचसीएल टेक, इन्फोसिस, कोटक बँक, आयटीसी, एनटीपीसी, एशियन पेंट्स हे शेअर्स १ ते १.५ टक्क्यांपर्यंत घसरले. तर दुसरीकडे इटरनलचा शेअर्स ३.४ टक्के वाढून बंद झाला. टाटा मोटर्स, सन फार्मा, टाटा स्टील, टायटन हे शेअर्सही वाढून बंद झाले.
सेक्टरलमध्ये निफ्टी एमएफसीजी निर्देशांक १.१ टक्के घसरला. यावर नेस्ले इंडियाचा शेअर्स ५.५ टक्के घसरून टॉप लूजर ठरला. निफ्टी आयटी २.२ टक्के घसरला. यावर Coforge शेअर्स ९ टक्के घसरला. तर पर्सिस्टंटचा शेअर्स ७.६ टक्के, टेक महिंद्राचा शेअर्स ३.२ टक्के घसरला.
कमकुवत कमाई आणि सावध जागतिक संकेतांचे पडसाद आज शेअर बाजारात दिसून आले. भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार कराराबद्दलच्या आशावाददेखील बाजारातील उत्साह वाढवू शकला नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्रीही बाजारातील घसरणीसाठी कारणीभूत ठरली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी गुरुवारी एका दिवशी ४,२०९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. यामुळे विशेषतः लॉर्जकॅप शेअर्सवर दबाव दिसून आला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्चा तेलाच्या दरात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर ०.३ टक्के वाढून प्रति बॅरल ६८.७२ डॉलरवर पोहोचला आहे.