सेन्सेक्स ३६१ अंकांनी वाढला, 'SmallCap'ची उसळी, ३.४२ लाख कोटींची कमाई

Stock Market Closing Bell | निफ्टी २५ हजारांवर स्थिरावला
Stock Market BSE Sensex
सेन्सेक्स आज (दि. १० सप्टेंबर) वधारुन बंद झाला.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

जागतिक सकारात्मक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात (Stock Market) मंगळवारी (दि.१०) तेजीत बंद झाला. आज मजबूत सुरुवातीनंतर बाजारात चढ-उतार दिसून आला. पण आजच्या सत्रातील अखेरच्या तासांत जोरदार तेजी राहिली. सेन्सेक्स (Sensex) ३६१ अंकांनी वाढून ८१,९२१ वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी (Nifty) १०४ अंकांच्या वाढीसह २५,०४१ वर स्थिरावला.

Summary

ठळक मुद्दे

  • सेन्सेक्स ३६१ अंकांनी वाढून ८१,९२१ वर बंद.

  • एनएसई निफ्टी १०४ अंकांच्या वाढीसह २५,०४१ वर स्थिरावला.

  • ऑईल आणि गॅस वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद.

  • टेलिकॉम आणि मीडिया प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले.

  • कॅपिटल गुड्स, आयटी, हेल्थकेअर, पॉवरमध्ये प्रत्येकी १ टक्के वाढ.

  • स्मॉलकॅप १.५ टक्क्यांनी वाढून बंद.

गुंतवणूकदार ३.४२ लाख कोटींनी मालामाल

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज १० सप्टेंबर रोजी ३.४२ लाख कोटींनी वाढून ४६३.५९ लाख कोटींवर पोहोचले. ९ सप्टेंबर रोजी ते ४६०.१७ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना आज ३.४२ लाख कोटींचा फायदा झाला.

IT शेअर्स चमकले

ऑईल आणि गॅस वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. टेलिकॉम आणि मीडिया प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. तर कॅपिटल गुड्स, आयटी, हेल्थकेअर, पॉवर प्रत्येकी १ टक्के वाढले. बीएस मिडकॅप ०.५ टक्के आणि स्मॉलकॅप १.५ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

Sensex वरील टॉप गेनर्स शेअर्स कोणते?

सेन्सेक्सवर भारती एअरटेल, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, टीसीएस, टायटन, अदानी पोर्ट्स, मारुती हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले.

BSE Sensex
सेन्सेक्सवर आज एनटीपीसीचा शेअर्स आघाडीवर राहिला.(Photo- BSE)

एनएसई निफ्टीवर डिव्हिस लॅबचा शेअर्स ५ टक्क्यांनी वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर LTIMindtree, भारती एअरटेल, विप्रो, एचसीएल टेक हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी वाढले. तर एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ, बजाज फिनसर्व्ह, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स हे शेअर्स १ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले.

NSE Nifty 50
निफ्टी ५० निर्देशांक आज २५ हजारांवर बंद झाला.(NSE)

विमा कंपन्यांचे शेअर्स घसरले, कारण काय?

आरोग्य विमा प्रीमियम्सवरील जीएसटी कपातीचा निर्णय पुढे ढकलल्यानंतर आज विमा कंपन्यांचे शेअर्स घसरले. यात एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ यांचा समावेश होता.

अमेरिकेतील बाजारात विक्रीनंतर रिकव्हरी

सोमवारी अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी राहिली होती. येथील प्रमुख निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक वाढून बंद झाले. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा झाला होता. पण आता येथील बाजारात रिकव्हरी दिसून आली आहे.

परदेशी गुंतवणूकदार बनले खरेदीदार

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) ९ सप्टेंबर रोजी १,१७६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर याच एका दिवसात देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी १,७५७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

Stock Market BSE Sensex
राष्ट्रीय बचत योजनेतील बदल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news