राष्ट्रीय बचत योजनेतील बदल

नवे नियम 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार
Changes in the National Savings Scheme
राष्ट्रीय बचत योजनेतील बदलPudhari File Photo
Published on
Updated on
विधिषा देशपांडे

अर्थ मंत्रालयाने टपाल कार्यालयाच्या नॅशनल स्मॉल सेव्हिंगसंदर्भात (राष्ट्रीय लघू बचत योजना) नवीन नियम जारी केले आहेत. नव्या नियमानुसार अनियमित खात्यांना नियमित करण्यात येणार आहे. नॅशनल स्मॉल सेव्हिंग स्किम्सचे नवे नियम 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहेत. यासाठी ‘एनएसएस’च्या योजनेंतर्गत वेगवेगळ्या श्रेणी निश्चित करण्यात आल्या असून गाईडलाईन जारी केली आहे.

एकप्रकारे अर्थमंत्रालयाने पोस्ट ऑफिसच्या नॅशनल स्मॉल सेव्हिंग योजनेतील बेकायदा खात्यांना नियमित करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नव्या नियमानुसार नॅशनल सेव्हिंग स्किम, पब्लिक प्रॉव्हिडंड फंड आणि सुकन्या समृद्धी खात्याशी संबंधित गुंतवणूकदारांच्या खात्यांच्या स्वरूपात बदल केला आहे.

Changes in the National Savings Scheme
कोल्हापूर :’एक रुपयात पिकविमा योजने’तून महत्त्वाची पिके वगळली

राष्ट्रीय बचत योजनेतील खाती

2 एप्रिल 1990 च्या अगोदरचे खाते : पहिल्या खात्यावर सध्याच्या योजनेनुसार व्याज मिळेल. दुसर्‍या खात्यातील शिलकीवर पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट (पीओएसए) व्याजदर प्लस दोन टक्के व्याज मिळेल. एक ऑक्टोबर 2024 नंतर दोन्ही खात्यांवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

2 एप्रिल 1990 सुरू केलेली खाती : पहिल्या खात्यावर सध्याच्या योजनेनुसार व्याज मिळेल, तर दुसर्‍या खात्यावर ‘पीओएसए’ दरानुसार व्याज मिळेल. 1 ऑक्टोबर 2024 नंतर दोन्ही खात्यांवरचे व्याजदर शून्य होतील.

दोनपेक्षा अधिक खाती असतील तर... : तिसर्‍या आणि जादा खात्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही. मूळ रक्कम परत दिली दिली जाईल.

सुकन्या समृद्धी खाते

बेकायदा मार्गाने सुरू केलेले खाते : अशा खात्यांना सामान्य व्याजासह नियमित करता येऊ शकते. सामान्य योजनांच्या कॅलक्यलेशनसाठीचा दर ‘पीओएसए’च्या निश्चित दरानुसार ठरविला जाईल.

आजी-आजोबांकडून सुरू केलेले खाते : आजी-आजोबाने खाते उघडले असेल (कायदेशीर पालक नाही), तर त्यांना पालक किंवा कायदेशीर पालकाच्या नावावर खाते स्थानांतरित करावे लागेल.

दोनपेक्षा अधिक असेल तर : योजनेच्या नियमाविरुद्ध सुरू केलेले अतिरिक्त खाते बंद केले जाईल.

पीपीएफ खाते

अल्पवयीन मुलाच्या नावावर खाते : मुलांचे वय 18 होईपर्यंत पीओएसएच्या दराने व्याज मिळेल. वयाच्या 18 व्या वर्षानंतर त्याला संबंधित व्याजदर लागू होईल. मॅच्युरिटीचे कॅलक्युलेशन हे अल्पवयीन मुलगा सज्ञानपासून केले जाईल.

एकापेक्षा अधिक पीपीएफ खाते : खात्यातील जमा असलेला पैसा वार्षिक मर्यादेपेक्षा अधिक नसेल, तर प्राथमिक खात्याला योजनेचा व्याजदर लागू होईल. कोणत्याही दुसर्‍या खात्यातील शिलकीला प्राथमिक खात्याशी जोडले जाईल. अतिरिक्त रक्कम शून्य टक्के व्याजासह परत केली जाईल.

दोनपेक्षा अधिक खाते : दोनपेक्षा अधिक खात्यांवर त्यांच्या सुरुवातीच्या तारखेपासून शून्य टक्के व्याज मिळेल.

अनिवासी भारतीय पीपीएफ खाते : अनिवासी भारतीयांचे पीपीएफ खाते सक्रिय असेल, तर त्यासाठी स्थानिक पत्त्याची माहिती देण्याची आवश्यकता नाही. त्यांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ‘पीओएसए’प्रमाणे व्याज मिळेल. त्यानंतर व्याजदर शून्य टक्के राहील.

Changes in the National Savings Scheme
पीपीएफ खाते बंद पडले आहे का? सक्रिय करण्यासाठी जाणून घ्या प्रक्रिया

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news