Sting Energy Drink FSSAI Order: स्टिंगच्या बॉटलवरून 'Energy' शब्द गायब! FSSAI चा मोठा निर्णय; रेड बुल, मॉन्स्टरने मागितला वेळ

Sting Energy Drink FSSAI Order
Sting Energy Drink FSSAI Orderpudhari
Published on
Updated on

Sting Energy Drink FSSAI Order: पेप्सीको इंडियाने आपल्या सर्व स्टिंग बॉटल आणि कॅनवरील एनर्जी हा शब्द हटवला आहे. FSSAI ने सर्व उत्पादकांना एनर्जी ड्रिंक्स हटवण्यासाठी ९० दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर पेप्सिकोने हा निर्णय घेतला असून त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी मात्र अजून जास्त वेळ देण्याची मागणी केली आहे.

पेप्सीको कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 'आम्ही सर्व वियमांचे पूर्णपणे पालन करणार आहोत.' दुसरीकडं रेड बुल, रिलायन्स कंज्युमर प्रोडक्ट्स, मॉन्स्टर अँड हेल यांनी स्वतंत्ररित्या सरकारकडून डेडलाईन वाढवण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Sting Energy Drink FSSAI Order
FSSAI Liquor Brands Notice: ओल्ड मंक, मॅकडोवेल्ससह अनेक लोकप्रिय ब्रँड अडचणीत; एफएसएसएआयच्या नोटिसांनी खळबळ, नेमकं काय घडलं?

पेप्सीकोच्या एक्झिक्युटिव्हने सांगितलं की, 'नवीन सर्व कॅन्स आणि बॉटल्स हे एनर्जी या शब्दाशिवाय तयार केले जात आहेत. आमच्याकडील स्टॉक देखील लवकरच संपणार आहे. स्टिंगच्या सर्व जाहिरातीतील शब्दरचना बदलण्यात येत आहे. यात फॉर्म्युला वन स्पॉन्सरशिपचा देखील समावेश आहे.'

पेप्सीकोने गेल्या वर्षी फॉर्म्युला सोबत पाच वर्षाचा स्पॉन्सरशिप करार केला होता. यानुसार स्टिंग हे या खेळाचे अधिकृत एनर्जी ड्रींक्स असणार आहे. यात टीव्हीवर ट्रॅकसाईडच्या जाहिरातींचा आणि फॅन झोन अॅक्टिव्हेशन आणि मार्केटिंगचा देखील समावेश असणार आहे.

Sting Energy Drink FSSAI Order
FSSAI oil consumption advice: दररोज कोणते तेल किती अन् कसे खाणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे? जाणून घ्या FSSAIचा सल्ला?

स्टिंग हे सध्या या मार्केट सेगमेंटमधील मार्केट शेअरच्या बाबतीत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात भारतातील मार्केटचा देखील समावेश आहे. एनर्जी ड्रिंक्स श्रेणी ही जवळपास १३ हजार कोटी रूपयांची बाजारपेठ आहे. वेगवेगळे ब्रँड्स वर्षाकाठी जवळपास २००० कोटी रूपये याचे मार्केटिंग करण्यासाठी खर्च करत आहेत.

या श्रेणीत रेड बुलचा गेल्या अनेक वर्षापासून दबदबा होता. त्यानंतर २०१७ मध्ये स्टिंग २५० एमएल बॉटल आणि कॅनमध्ये लाँच झाली. कमी किंमतीत लाँच झालेल्या या प्रोडक्टने झपाट्याने मार्केट शेअर गेन करायला सुरूवात केली. याची पर बॉटल २० रूपये किंमत ग्राहकांना आकर्षित करू लागली.

Sting Energy Drink FSSAI Order
FSSAI oil consumption advice: दररोज कोणते तेल किती अन् कसे खाणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे? जाणून घ्या FSSAIचा सल्ला?

आता फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) ने आम्ही एनर्जी ड्रिंक्स अशी कोणतीही श्रेणीला मान्यता देणार नाही. ही ड्रिंक्स शरीर आणि मेंदू स्ट्राँग आणि अॅक्टिव्ह करतात हा दावा ग्राहकांची दिशाभूल करणारा आहे असं FSSAI ने सांगितलं आहे.

दरम्यान, इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार आता डिस्ट्रिब्युटर हे सध्याचा एनर्जी ड्रिंक्स लिहिलेला स्टॉक उचलण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळं मार्केटमध्ये या ड्रिंक्सचा पुरवठा कमी झाला आहे.

Sting Energy Drink FSSAI Order
FSSAI Milk Test | दुधात डिटर्जंट किंवा स्टार्चची भेसळ आहे का? FSSAI ने सांगितलेल्या सोप्या चाचण्या

दरम्यान, इंडियन बेव्हरेज असोसिएशनने FSSAI सीईओ रजित पुनहानी यांना पत्र लिहिलं आहे. यात कोको कोला, पेप्सीको आणि रिलायन्स यांची मोठी भूमिका आहे. नवीन नियम लागू करण्यापूर्वी कंपनीच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news