Sensex Nifty Today | शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स ६५० अंकांनी वाढला

'या' शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला सपोर्ट
Stock Market Sensex Nifty
सेन्सेक्स आणि निफ्टी आज वाढून खुले झाले आहेत.file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

शेअर बाजारातील गेल्या पाच सत्रांतील घसरणीला शुक्रवारी (दि. २६) ब्रेक लागला. सेन्सेक्स (Sensex Today) आणि निफ्टी (Nifty Today) वाढून खुले झाले आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ६५० हून अधिक वाढून ८०,७०० वर पोहोचला. तर निफ्टी २४० अंकांनी वाढून २४,६५० पार झाला. आयटी आणि एनर्जी शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला आहे. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर टाटा स्टील, भारती एअरटेल, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, इन्फोसिस, सन फार्मा, एचसीएल टेक, टीसीएस, बजाज फायनान्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स हे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत. तर ॲक्सिस बँक, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. बीएसई मिडकॅप १.६ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप १.१ टक्क्यांनी वाढला आहे.

Stock Market Sensex Nifty
Budget 2024 | F&O ट्रेडिंग करणाऱ्यांना धक्का! STT वाढ घोषणेनंतर शेअर बाजारात पडझड

निफ्टीवर डिव्हिस लॅब, टाटा स्टील, अपोलो हॉस्पिटल, कोल इंडिया, LTIMindtree हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर ॲक्सिस बँक, ओएनजीसी, नेस्ले इंडिया, एचडीएफसी हे शेअर्स घसरले आहेत. क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी मेटल १ टक्के वाढला आहे. निफ्टी आयटीदेखील तेजीत आहे.

जागतिक बाजार

अमेरिकेतील बाजारातील घसरणीनंतर आशियाई बाजारात कमकुवत स्थिती दिसून आली आहे. फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरमध्ये व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल या अपेक्षेने दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वाढली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे.

Stock Market Sensex Nifty
Budget 2024 | रद्द केलेला Angel Tax काय आहे? याचा स्टार्टअपशी काय संबंध?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news