

Share Market Closing Bell May 26th 2025
मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी (26 मे 2025) देशाच्या शेअर बाजारात तेजीचा माहोल पाहायला मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेंसेक्स 455 अंकांनी वाढून 82,176 वर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी 148 अंकांची उसळी घेत 25,001 वर बंद झाला. शुक्रवारी (23 मे) सेन्सेक्स 769 अंकांनी वाढून 81721 वर बंद झाला होता. तर निफ्टी 243 अंकांनी वाढून 24853 वर बंद झाला होता.
सोमवारी 26 मे रोजी सेंसेक्समधील 30 पैकी 22 शेअरमध्ये वाढ, तर 8 शेअर घसरले. निफ्टीच्या 50 पैकी 38 शेअर वधारले, 12 शेअर घसरले. ऑटो, मेटल, IT आणि रिअल्टी क्षेत्रात जोरदार खरेदी पाहायला मिळाली.
सेन्सेक्समध्ये 0.56 टक्के वाढ होऊन 82176 वर बंद झाला. निफ्टीमध्ये 0.56 टक्के वाढ झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांकामध्ये 250 (0.56 टक्के) वाढ झाली. तर BSE स्मॉल कॅप निर्देशांक 245 अंकांची (0.48 टक्के) वाढ होऊन 51,767 वर पोहचला.
कंपनी बंद भाव (₹) वाढ (₹) वाढ (%)
बजाज ऑटो 8,950 ₹209 +2.39%
JSW स्टील 1,030 ₹22 +2.13%
महिंद्रा & महिंद्रा 3,075 ₹62 +2.07%
टॉप लूझर्स (Nifty):
जोमैटो 227 ₹11 -4.59%
अल्ट्राटेक सिमेंट 11676 ₹70 -0.60%
कोटक महिंद्रा बँक 2090 ₹11 -0.51%
जपानचा निक्केई : +250 अंकांनी वाढून 37400 वर पोहोचला
कोरियाचा कोस्पी : +1.26 टक्क्यांनी वाढून 2624 वर पोहोचला
हॉंगकॉंगचा हँगसेंग : -1.02 टक्क्यांन घटून 23360 वर आला
चीनचा शांघाय कंपोझिट : -0.30 टक्क्यांनी 3340 वर आला.
एफआयआय आणि डीआयआय कडून 23 मे रोजी मोठी शेअर्स खरेदी झाली होती. एफआयआय (परदेशी गुंतवणूकदार): ₹1,794.59 कोटींची खरेदी केली आहे तर डीआयआय (स्थानिक गुंतवणूकदार): ₹299.78 कोटींची खरेदी केली.
मे महिन्यातील एकूण गुंतवणूक (आजअखेर):
एफआयआय: ₹12,191.61 कोटी
डीआयआय: ₹34,497.56 कोटी
‘द लीला’ हॉटेल्सची पॅरेंट कंपनी श्लॉस बंगलोर लिमिटेड हिचा IPO आज (26 मे) खुला झाला आहे. कंपनी ₹3,500 कोटी उभारणार आहे. IPO मध्ये सहभागी होण्यासाठी शेवटची तारीख 28 मे 2025 आहे.
सध्या बाजारात सकारात्मक वातावरण आहे. स्थानिक गुंतवणूकदारांची खरेदी, परदेशी निधीचा ओघ आणि काही क्षेत्रांतील मजबूत कामगिरीमुळे बाजारात चैतन्य दिसून येते. आगामी IPO, जागतिक घडामोडी आणि निवडणूकपूर्व वातावरणामुळे गुंतवणूकदार सतर्क आहेत.