Income Tax Return 2025 | ITR भरण्याची शेवटची तारीख जवळ: तुमचा रिटर्न भरला का?

ITR Mistakes To Avoid | आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया समजून घ्या – टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन
Income Tax Return
Income Tax Return(File Photo)
Published on
Updated on

सतीश डकरे, सीए

Summary

Income Tax Return

आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. विलंब शुल्काशिवाय प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे. अशा परिस्थितीत अनेक जणांची रिटर्न भरण्यासाठीची लगबग सुरू आहे. तथापि, या गडबडीमध्ये रिटर्न भरताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते, अन्यथा तुमचे विवरण पत्र रद्द होऊ शकते.

1. योग्य आयटीआर फॉर्म निवडा

टॅक्स रिटर्न भरताना तुमच्या उत्पन्नाच्या प्रकारानुसार योग्य फॉर्म निवडणे अत्यावश्यक आहे :

आयटीआर-1 (Sahaj) : फक्त पगारधारक व्यक्तींसाठी (रु. 50 लाखांपर्यंत उत्पन्न).

आयटीआर-2 : जर तुमचं घरभाडं, भांडवली नफा (जसे शेअर विक्री) किंवा परदेशी उत्पन्न असेल.

आयटीआर-3 : स्वतःचा व्यवसाय किंवा फ्रीलान्स काम करणार्‍यांसाठी.

आयटीआर-4 (Sugam) : छोट्या व्यवसायांसाठी किंवा प्रोफेशनल लोकांसाठी (सरल पद्धत वापरणार्‍यांसाठी).

चुकीचा फॉर्म वापरल्यास तुमचा रिटर्न अवैध ठरू शकतो.

2. तुमचं उत्पन्न सरकारकडे नोंदलेलं आहे का हे तपासा

फॉर्म 26AS आणि AIS & TIS पाहा.

फॉर्म 26AS - तुमच्या नावावर कोणत्या कंपन्यांनी/बँकांनी टीडीएस कापलं आहे, हे दाखवतं.

अखड (अपर्पीरश्र खपषेीारींळेप डींरींशाशपीं): तुमचं उत्पन्न, व्यवहार, व्याज, शेअर्स, भाडं इत्यादी दाखवतं.

तुमच्या कागदपत्रांतील माहिती आणि यामधील माहिती जुळायला हवी, नाहीतर नोटीस येऊ शकते.

Income Tax Return
अर्थभान : बाजाराची उसंत, सप्ताहात संथ कारभार

3. सर्व प्रकारचं उत्पन्न जाहीर करा

फक्त पगार नाही, तर इतर उत्पन्नही लिहावे.

पगार / पेन्शन

बँकेचं व्याज (सेव्हिंग्स, एफडी)

घरभाडं

शेअर/म्युच्युअल फंड/क्रिप्टो विकून मिळालेला नफा

ट्युशन, फ्रीलान्सिंग, पार्टटाईम उत्पन्न.

अगदी थोडं उत्पन्न जरी असेल तरीही लपवू नका.

image-fallback
अर्थभान : क्रेडिट कार्डचा शुल्कमहिमा    

4. वाजवी टॅक्स वाचवण्यासाठी योग्य सूट घ्या

तुम्ही खालील गोष्टी दाखवून टॅक्समध्ये सूट मिळवू शकता :

80 सी (1.5 लाखपर्यंत): एलआयसी, पीएफ, पीपीएफ, ट्युशन फी, ईएलएसएस

80 डी : आरोग्य विमा प्रीमियम

80 टीटीए : बचत खात्यावरील व्याज (10,000 पर्यंत)

एचआरए (घरभाडं भत्ता) : भाड्याच्या घरात राहत असाल तर.

खोटी माहिती देऊ नका - सर्व पावत्या/दस्तऐवज ठेवा.

image-fallback
अर्थभान : डेट म्युच्युअल फंडचे फायदे

5. शेअर्स/मालमत्ता विकल्यास ते जाहीर करा

जर तुम्ही,

घर, जमीन, शेअर्स, म्युच्युअल फंड, क्रिप्टो विकले असतील, तर त्यातून मिळालेला नफा (कॅपिटल गेन) दाखवा.

हल्ली लोकांचे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, डेरिव्हेटिव्ह ट्रांजेक्शन्स खूप आहेत. अशा व्यवहारांना इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये योग्य ट्रीटमेंट देणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्यावर टॅक्स लागतो, पण काही सूटही मिळू शकते.

6. परदेशी उत्पन्न/मालमत्ता असल्यास जाहीर करा

जर तुम्ही भारतात राहणारे (रहिवासी) असाल आणि

परदेशात बँक खाते आहे

परदेशात गुंतवणूक / प्रॉपर्टी आहे

परदेशातून उत्पन्न मिळत असेल तर हे सर्व जाहीर करणं बंधनकारक आहे. लपविल्यास मोठी शिक्षा होऊ शकते.

7. बँक खात्याची माहिती बरोबर भरा

तुमचं बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड योग्य असायला हवं.

हाच खाते क्रमांक रिफंडसाठी वापरला जातो.

ते खाते पॅन व आधारशी लिंक केलेले असावं.

8. पॅन आणि आधार लिंक असावं

सरकारनं सांगितले आहे की, तुमचं पॅन कार्ड आणि आधार लिंक असणं आवश्यक आहे.

लिंक नसेल तर तुमचा रिटर्न अमान्य होऊ शकतो.

9. स्पेलिंग आणि आकड्यांची चूक टाळा

तुमचं नाव (आधारवरचं नाव), पॅन, आधार क्रमांक, उत्पन्न इत्यादी काळजीपूर्वक भरा.

छोट्या चुका रिटर्न प्रक्रिया लांबवू शकतात.

10. रिटर्न ‘व्हेरिफाय’ करणं आवश्यक आहे

फॉर्म भरल्यानंतर, तो ई-व्हेरिफाय (आधार, ओटीपी, नेटबँकिंग) किंवा स्वाक्षरी करून पोस्टाने पाठवा (सीपीसी, बेंगळुरु).

30 दिवसांत व्हेरिफाय न केल्यास रिटर्न रद्द होतो.

11. वेळेत रिटर्न भरा

उशीर केल्यास रु. 5,000 पर्यंत दंड लागतो.

काही नुकसान (जसे शेअर बाजारातील) पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करता येत नाही.

12. सर्व कागदपत्रांची कॉपी ठेवा

आयटीआर-5 अ‍ॅक्नॉलेजमेंट

फॉर्म 16 (जर नोकरी असेल तर)

बँकेचे टीडीएस प्रमाणपत्र,

पावत्या. हे कर्ज/व्हिसासाठीही उपयोगी पडतात.

थोडक्यात चेकलिस्ट

खालील सर्व गोष्टी तपासून त्याला पुढे टिक केली आहे का? हे पाहावे.

योग्य फॉर्म निवडला का?

फॉर्म 26AS/AIS तपासलं का?

सर्व उत्पन्न जाहीर केलं का?

सूट/डिडक्शन योग्यरीत्या घेतले का?

शेअर/मालमत्तेचा नफा दाखवला का?

परदेशी माहिती दिली का?

बँक तपशील बरोबर आहेत का?

पॅन व आधार लिंक आहे का?

फॉर्म/आयटीआर वेळेत भरला आहे का?

व्हेरिफिकेशन केलं का?

सर्व कॉपी सेव्ह केल्या आहेत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news