Mumbai Rain Update: मुंबईत मे महिन्यात 100 वर्षातील सर्वाधिक पाऊस, 1918 नंतर पहिल्यांदाच इतका पाऊस

Mumbai Rain Update: मे महिन्यात 295 मिमी पावसाची नोंद, आजपर्यंतचा सर्वाधिक लवकर मॉन्सून प्रवेश
Image Of Woman walking in Rain with umbrella
Mumbai RainDEEPAK SALVI
Published on
Updated on

Mumbai Rain Update Highest Rainfall in May after 1918

मुंबई : मुंबईत यंदा मान्सूनने लवकर हजेरी लावून विक्रम केला आहे. 26 मे 2025 रोजी मुंबई शहरात मान्सून दाखल झाला आणि हा दिवस मुंबईच्या इतिहासात सर्वात लवकर मान्सून आगमनाचा ठरला आहे. याआधी सन 1956, 1962 आणि 1971 या वर्षांमध्ये 29 मे हा सर्वात लवकर मान्सून आगमनाचा दिवस नोंदवला गेला होता. मात्र यंदा हा विक्रम मोडीत निघाला आहे.

विशेष म्हणजे या जोरदार पावसामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) सकाळी दिलेला ‘ऑरेंज’ अलर्ट दुपारी 12.38 वाजता ‘रेड’ अलर्टमध्ये रूपांतरित केला. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी हे इशारे देण्यात आले आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईत सर्वाधिक पाऊस

IMD च्या कुलाबा वेधशाळेने 24 तासांत (सोमवार सकाळी 8.30 पर्यंत) 135.4 मिमी पावसाची नोंद केली, ज्याला “खूप जास्त पाऊस” म्हणून वर्गीकृत केले जाते. याउलट, सांताक्रूझ वेधशाळेने केवळ 33.5 मिमी पाऊस नोंदवला.

कुलाबा वेधशाळेने मे महिन्यातील सर्वाधिक पावसाचा विक्रमही मोडला आहे. आतापर्यंत या महिन्यात 295 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधीचा विक्रम 1918 मध्ये 279.4 मिमी इतका होता. 2021 मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळादरम्यान पडलेला पाऊस देखील याहून कमी (२५७.८ मिमी) होता.

वेधशाळेनुसार ठिकठिकाणची पावसाची नोंद (9 ते 10सकाळी):

  • नरिमन पॉईंट फायर स्टेशन: 104 मिमी

  • ए वॉर्ड कार्यालय: 86 मिमी

  • कुलाबा पंपिंग स्टेशन: 83 मिमी

  • महापालिका मुख्यालय: 80 मिमी

  • कुलाबा फायर स्टेशन: 77 मिमी

  • ग्रँट रोड डोळ्यांचे रुग्णालय: 67 मिमी

  • मेमनवाडा फायर स्टेशन: 65 मिमी

  • मलबार हिल: 63 मिमी

  • डी वॉर्ड: 61 मिमी

उपनगरांतील पावसाची नोंद:

  • मानखुर्द, न्यूटन विद्यालय: 13-16 मिमी

  • खारदांडा, सुपारी टँक, गझादरबंध पंपिंग स्टेशन: 29 मिमी

  • विलेपार्ले, एसडब्ल्यूएम वर्कशॉप: 22 मिमी

शहर जलमय

मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ब्रीच कँडी, केम्प्स कॉर्नर, सायन सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, जेजे मार्ग पोस्ट ऑफिस, कुरणे चौक, बिंदू माधव जंक्शन (वरळी) आणि फाईव्ह गार्डन्स येथे पाणी साचल्याची माहिती आहे.

नुकसान

झाडे/फांद्या पडण्याच्या 9 घटना नोंद झाल्या आहेत. यातील शहरात 4, पश्चिम उपनगरात 5 घटना आहेत. केम्प्स कॉर्नर येथे रस्ता खचल्यासारखा झाला होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पाण्याच्या दाबामुळे डांबर उखडून वर आले होता. येथे दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news