पुढारी ऑनलाईन डेस्क
भारतीय शेअर बाजाराने (Stock Market Updates) आज शुक्रवारी (२३) वाढून सुरुवात केली होती. पण बाजार खुला होताच लगेच काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट झाले. आज ८१,१६५ अंकांवर खुला झालेला सेन्सेक्स (Sensex) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ८१ हजारांच्या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty) २४ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,७८० च्या वर होता. आज आयटी, बँक आणि फायनान्सियल शेअर्समध्ये दबाव दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर टायटन, इन्फोसिस, आयटीसी, टेक महिंद्रा, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स हे शेअर्स घसरले आहेत. तर टाटा मोटर्स, रिलायन्स, सन फार्मा, भारती एअरटेल हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.
अमेरिकेतील बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारातील आयटी शेअर्समध्ये कमजोरी दिसून येत आहे. निफ्टी आयटी सुमारे १ टक्के घसरला आहे. निफ्टीवर टायटन, LTIMindtree, इन्फोसिस, विप्रो, ग्रासीम हे शेअर्स घसरले आहेत. तर बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, अपोलो हॉस्पिटल, टाटा मोटर्स, हिंदाल्को या शेअर्स तेजीत आहेत.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल आज शुक्रवारी होणाऱ्या भाषणात व्याजदरात कपात होईल की नाही याबाबत संकेत देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. परिणामी निफ्टी आणि सेन्सेक्स सपाट झाले आहेत.