Stock Market Updates | सेन्सेक्स पहिल्यांदाच ८० हजारांवर, 'निफ्टी'चाही नवा उच्चांक

भारतीय शेअर बाजाराने इतिहास रचला
BSE Sensex
सेन्सेक्सने आज ५७० अंकांनी वाढून पहिल्यांदाच ८० हजारांच्या अंकाला स्पर्श केला. file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

बँकिंग शेअर्समधील तेजीच्या जोरावर बुधवारी (दि.३) भारतीय शेअर बाजाराने सर्वकालीन उच्चांक नोंदवला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने (Sensex) ५७० अंकांनी वाढून पहिल्यांदाच ८० हजारांच्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टीने (Nifty) २४,३०० चा विक्रमी उच्चांक गाठला.

सेन्सेक्स आज सकाळी ८०,०१३ वर खुला झाला. त्यानंतर त्याने (Sensex record high) ८०,०७४ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेचा शेअर्स ३ टक्क्यांनी वाढून १,७९१ रुपयांवर पोहोचला. त्याचबरोबर ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक हे शेअर्सही हिरव्या रंगात व्यवहार करत आहे.

BSE Sensex
Stock Market | वेध शेअर बाजाराचा : ऐतिहासिक उच्चांकावर बाजार!

बँकिंग शेअर्स तेजीत

निफ्टीने (Nifty record high) सुरुवातीच्या व्यवहारात २४,३०७ अंकांवर झेप घेतली. त्यानंतर तो २४,२७० वर आला. निफ्टीवर एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, टाटा कन्झ्यूमर, ब्रिटानिया, बजाज ऑटो हे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत. तर टीसीएस, रिलायन्स, टाटा मोटर्स या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

निफ्टी फायनान्सियलमध्ये सर्वाधिक वाढ

निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले आहेत. निफ्टी बँक निर्देशांकावर फेडरल बँक आणि एचडीएफसी हे टॉप गेनर्स आहेत. ॲक्सिस बँक, बंधन बँक, कोटक बँक यांचेही शेअर्स तेजीत आहेत.

BSE Sensex
गुंतवणूक : आजीवन मोफत क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

BSE IT निर्देशांक घसरला

दरम्यान, बीएसई मिडकॅप ०.६ टक्क्यांनी आणि ०.८ टक्क्यांनी वाढला. तर ३८,१९० वर खुला झालेला बीएसई आयटी निर्देशांक ३७ हजारांच्या खाली आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news