पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील बुधवारच्या (दि.१९) अस्थिर सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले. पण सेन्सेक्सने आज सलग चौथ्या सत्रांत त्यांची विक्रमी उच्चांक कायम ठेवली. सेन्सेक्स ३६ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७७,३३७ वर बंद झाला. तर निफ्टी ४१ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २३,५१६ वर स्थिरावला. आज बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी राहिली. यामुळे बँक निफ्टीने ५२ हजारांजवळ जात नवे शिखर गाठले.
क्षेत्रीय आघाडीवर बँक निफ्टी १.९० टक्के आणि आयटी ०.४ टक्क्यांनी वाढले. तर ऑटो, कॅपिटल गुड्स, मेटल, ऑईल आणि गॅस, पॉवर आणि रियल्टी १-३ टक्क्यांनी घसरून बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.९ टक्के आणि स्मॉलकॅप ०.५ टक्क्यांनी घसरला.
सेन्सेक्सवर एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, इंडसइंड बँक हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर टायटन, एलटी, भारती एअरटेल, मारुती, एनटीपीसी, रिलायन्स, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.
आज बँक निफ्टी निर्देशांक मुख्य निर्देशांकांमध्ये सर्वोच्च क्षेत्रीय योगदानकर्ता ठरला. बँक निफ्टीवर ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स सुमारे २ ते ३ टक्क्यांनी वाढले. यामुळे बँक निफ्टीने आज विक्रमी ५१,९५७ चा विक्रमी उच्चांक नोंदवला. त्यानंतर बँक निफ्टी १.९० टक्के वाढीसह ५१,३९८ वर बंद झाला.
कॅसिनो गेमिंग उद्योगातील एकमेव सूचीबद्ध कंपनी डेल्टा कॉर्पचे शेअर्स (Delta Corp Share Price) बीएसईवर जवळपास १५ टक्क्यांनी वाढून १५१ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले. त्यानंतर हा शेअर्स १४८ रुपयांवर स्थिरावला. कारण वस्तू आणि सेवा कर (GST) परिषद २२ जून रोजी होणाऱ्या त्यांच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंगवरील कराबाबत आढावा घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कॅसिनो गेमिंग कंपनीचे शेअर्स वधारले.
हे ही वाचा :