Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ८८५ अंकांनी घसरून बंद, IT आणि ऑटो शेअर्स धडाम

शेअर बाजारातील पाच सत्रांतील तेजीला ब्रेक
BSE Sensex
सेन्सेक्स आज ८८५ अंकांनी घसरून ८०,९८१ वर बंद झाला. BSE
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

मध्य पूर्वेत भू-राजकीय तणाव तसेच जगातील सर्वात मोठ्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील घसरणीच्या चिंतेने भारतासह आशियाई शेअर बाजारात (Stock Market Closing Bell) शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट) मोठी घसरण झाली. सेन्सेक्स (Sensex) आज ८८५ अंकांनी घसरून ८०,९८१ वर बंद झाला. निफ्टी (Nifty) २९३ अंकांनी घसरून २४,७१७ वर स्थिरावला. सेन्सेक्स, निफ्टीची आजची घसरण अनुक्रमे १.०८ टक्के आणि १.२ टक्के एवढी होती. आजच्या ट्रेडिंग सत्रात, ऑटो, आयटी आणि रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.

शेअर बाजारातील घसरणीचे कारणे

Summary
  • जागतिक बाजारातून कमकुवत संकेत.

  • अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील घसरणीच्या चिंतेने गुंतवणूकदारांची सावध भूमिका.

  • फेडरल रिझर्व्हद्वारे संभाव्य व्याजदर कपातीची शक्यता कमीच.

  • मध्य पूर्वेत भू-राजकीय तणाव वाढला.

  • मध्य पूर्वेतील संभाव्य पुरवठा अडथळ्याच्या चिंतेमुळे तेलाच्या किमतींत वाढ.

  • शेअर बाजारात पाहायला मिळाले प्रॉफिट बुकिंग.

गुंतवणूकदारांचे उडाले ४.५६ लाख कोटी

बाजारातील आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.५६ लाख कोटींनी कमी होऊन ४५७.०६ लाख कोटींवर पोहोचले.

पाच सत्रांतील तेजीला ब्रेक

गेल्या पाच सत्रांत बाजारात तेजी राहिली होती. पण शुक्रवारच्या सत्रात या तेजीला ब्रेक लागला. क्षेत्रीय आघाडीवरील फार्मा आणि हेल्थकेअर वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. ऑटो, एनर्जी, पीएसयू बँक, बँक, आयटी, मेटल आणि रियल्टी १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. बीएसई मिडकॅ १.१ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप ०.५ टक्क्यांनी घसरून बंद झाला.

BSE Sensex
Stock Market Updates | Nifty चा नवा विक्रम! केवळ २४ ट्रेडिंग सत्रांत २४ हजारांवरून २५ हजारांवर

'हे' शेअर्स घसरले

सेन्सेक्सवर मारुती, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, एलटी, टाटा स्टील, टीसीएस, एम अँड एम, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, रिलायन्सस हे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर एचडीएफसी बँक, सन फार्मा, कोटक बँक, नेस्ले इंडिया हे शेअर्समध्ये तेजी राहिली.

‍BSE Sensex
सेन्सेक्स आज १.०८ टक्क्यांनी घसरला.‍BSE

गुरुवारी २५ हजारांच्या विक्रमी उच्चांकावर गेलेला निफ्टी निर्देशांक शुक्रवारी २४,७०० पर्यंत खाली आला. निफ्टीवर आयशर मोटर्स, टाटा मोटर्स, मारुती, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स ३ ते ५ टक्क्यांपर्यंत घसरले. तर डिव्हिस लॅब, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज, सन फार्मा हे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले.

NSE Nifty50
निफ्टी निर्देशांक शुक्रवारी २४,७१७ पर्यंत खाली आला.NSE

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त

कमकुवत मॅन्युफॅक्चरिंग आकडेवारीमुळे अमेरिकेतील अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच फेडरल रिझर्व्हद्वारे संभाव्य व्याजदर कपातीची आशावाद कमी झाला आहे. यामुळे तेथील बाजारात काल विक्रीचा मारा दिसून आला. या पार्श्वभूमीवर भारतासह आशियाई बाजारात आज घसरण पाहायला मिळाली.

BSE Sensex
Ola Electric IPO मध्ये पैसे गुंतवण्याची संधी! प्राइस बँड किती? वाचा संपूर्ण डिटेल्स

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news