Stock Market Closing Bell | मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग! सेन्सेक्स- निफ्टीची उच्चांकावरून माघार

बँकिंग शेअर्समध्ये घसरण, मेटल चमकले
BSE Sensex
सेन्सेक्स २१० अंकांनी घसरून ७९,०३२ वर स्थिरावला.file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स, निफ्टी शुक्रवारी (दि.२८) सलग चौथ्या दिवशी नवा विक्रमी उच्चांक नोंदवून माघारी परतले. बॅँकिंग शेअर्समधील प्रॉफिट बुकिंगमुळे दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्सने आजच्या ट्रेडिंग सत्रात ७९,६७१ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर सेन्सेक्स २१० अंकांनी घसरून ७९,०३२ वर स्थिरावला. निफ्टीने आज २४,१७४ चा उच्चांक नोंदवला. त्यानंतर निफ्टी ३३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,०१० वर बंद झाला.

बँकिंग शेअर्समध्ये घसरण, मेटल चमकले

क्षेत्रीय आघाडीवर हेल्थकेअर, मेटल, पीएसयू बँक, ऑईल आणि गॅस, रियल्टी ०.५-१ टक्क्यांनी वाढले. तर बँक निर्देशांक ०.८ टक्के आणि कॅपिटल गुड्स निर्देशांक ०.४ टक्क्यांनी खाली आला. दरम्यान, बीएसई मिडकॅप ०.४१ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५६ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

BSE Sensex
RIL चे Mcap २१ लाख कोटींवर; बनली देशातील सर्वात मूल्यवान कंपनी

जाणून घ्या टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर टॉप गेनर ठरला. हा शेअर्स ३,१६१ रुपयांपर्यंत वाढला. त्यानंतर हा शेअर्स २.१५ टक्के वाढीसह ३,१२६ रुपयांवर स्थिरावला. त्याचबरोबर टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया हे शेअर्सही वाढले. तर इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, कोटक बँक, मारुती, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले.

Stock Market BSE Sensex
सेन्सेक्सवरील शेअर्स.BSE Sensex

निफ्टीवर डॉ. रेड्डीज, ओएनजीसी, रिलायन्स, हिरो मोटोकॉर्प, एसबीआय लाईफ हे टॉप गेनर्स ठरले. तर ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, कोटक बँक, इंडसइंड बँक हे शेअर्स टॉप लूजर्स होते.

NSE Nifty 50
निफ्टी ५० वरील ट्रेडिंग आलेख.NSE

रिलायन्सचे बाजार भांडवल २१ लाख कोटींवर

जिओने नुकत्याच त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये बदल जाहीर केला. या पार्श्वभूमीवर रिलायन्सच्या शेअर्सने आज शुक्रवारी एनएसईवर निफ्टीवर ३,१६२ रुपयांच्या नवीन विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर हा शेअर्स २.१९ टक्क्यांनी वाढून ३,१२८ रुपयांवर स्थिरावला. दरम्यान, या तेजीमुळे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries market capitalization) २१ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी बनली. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

BSE Sensex
Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा एकदा नव्या शिखरावर; कोणते शेअर्स तेजीत?

आशियाई बाजारात संमिश्र स्थिती

आशियाई बाजारात संमिश्र स्थिती दिसून आली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.६१ टक्क्यांनी वाला. तर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक सपाट बंद झाला. चीनचा शांघाय कंपोझिट 0.७३ टक्क्यांनी वाढला. तर सिंगापूरचा FTSE स्ट्रेट्स टाइम्स निर्देशांक ०.२७ टक्क्यांनी घसरला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news