पुढारी ऑनलाई डेस्क
भारतीय शेअर बाजार रोज नवे शिखर गाठत आहे. सर्व क्षेत्रातील चौफेर खरेदीमुळे शुक्रवारी (दि.२८) शेअर बाजार (Stock Market Updates) सलग पाचव्या दिवशी तेजीत खुला झाला. सेन्सेक्सने (Sensex) सुरुवातीच्या व्यवहारात ४०० अंकांनी वाढून ७९,६७१ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. तर निफ्टी ५० निर्देशांकाने (Nifty 50) १०० अंकांनी वाढून २४,१७४ चा उच्चांक नोंदवला.
सेन्सेक्सवर एसबीआय, एनटीपीसी, रिलायन्स, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, नेस्ले इंडिया हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहेत. तर इंडसइंड बँक, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, कोटक बँक या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने रिचार्जचे दर वाढवले आहेत. यामुळे आज टेलिकॉम शेअर्स फोकसमध्ये आहेत. बीएसईवर रिलायन्सचा शेअर्स १ टक्क्यांनी वाढून ३,०९७ वर व्यवहार करत आहे.
निफ्टीवर डॉ. रेड्डीज, एसबीआय, ओएनजीसी, कोल इंडिया, एनटीपीसी हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर ग्रासीम, LTIMindtree, विप्रो, ॲक्सिस बँक हे शेअर्स टॉप लूजर्स आहेत. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्सियल निर्देशांक वाढून व्यवहार करत आहे.