सेन्सेक्सला लाखाचे वेध

सेन्सेक्सला लाखाचे वेध

[author title="भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि." image="http://"][/author]

लोकसभेच्या जागा कमी होऊनही नरेंद्र मोदींचे सरकार तिसर्‍यांदा स्थापन झाले. दोन इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन झाले, तरी महत्त्वाची खाती भाजपकडेच राहिली. नागरी वाहतूक वगळता बाकी सर्व खाती भाजपकडे राहिली. नाही तरी एअर इंडिया टाटांच्या ताब्यात गेल्यापासून या खात्याची चमक पूर्वीसारखी राहिली नव्हती. या घडामोडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आणि सर्व प्रमुख निर्देशांक सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले. त्यांचे शुक्रवारचे बंद भाव आणि याच सप्ताहातील त्यांचे उच्चांक पाहा :

निफ्टी 50 – 23465.60 उच्चांक 23490.40
सेन्सेक्स – 76992.77 उच्चांक 77145.46
बँक निफ्टी – 50002.00 उच्चांक 51133.20
निफ्टी मिड – 100 -55225.95 उच्चांक 55270.95
निफ्टी स्मॉल 100 – 18043.60 उच्चांक 18089.15

स्थिर सरकारची मजबूत आकांक्षा या तेजीला कारणीभूत आहे, हे तर खरेच; पण त्याचबरोबर इतरही काही कारणे या तेजीमागे आहेत. Positive Economic Indicators हे प्रथम कारण आहे.

अपेक्षेपेक्षा चांगली GDP वाढ, औद्योगिक उत्पादनाचे वाढीव आकडे आणि कमी होत जाणारी महागाई या गोष्टींमुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होतो. लोकसभा निवडणूक निकालांच्या दिवशी बाजारात जी सहा टक्क्यांहून अधिक घसरण खाली तिच्यापेक्षा कितीतरी अधिक उसळी नंतरच्या सप्ताहात बाजारात आली. हे असेच होते. बाजार जेवढा Crash होतो त्यापेक्षा नंतर जास्त Rebound होतो. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डिफेन्स सेक्टरच्या संपूर्ण स्वावलंबनाचा पुनरुच्चार केला. इतकेच नाही, तर पुढील पाच वर्षांत डिफेन्स सेक्टरपुढे 50,000 कोटी रुपये निर्यातीचे लक्ष ठेवले. त्यामुळे Paras Defence, Beml, Bel, MTAR, Bharat Dynamics, Zensar Teach या शेअर्समध्ये तेजी आली. जहाज बांधणी क्षेत्राचेही तसेच Cochin Shipyard, Adani Ports, Shipping Corporation हे शेअर्स चांगलेच प्रकाशझोतात राहिले. हिंदुस्तानएरॉनॉटिक्स HAL चे विमान बांधणीतील प्रभुत्व या शेअरला नवनवीन शिखरे दाखवत आहे. या क्षेत्रांच्या बरोबरीने लॉजिस्टिक्स सेक्टरची वाढ अपरिहार्यपणे होते. Container Corp, Titagarh Wagons आज आघाडीवर आहेतच शिवाय इथून पुढेही राहतील.

पायाभूत विकास हे कोणत्याही देशाच्या Growth Story चे मर्मस्थान असते. या सरकारने Capital Expenditure च्या प्रती प्रथमपासून जी आस्था दाखवली आहे ती इथून पुढेही तशीच राहील. या गुंतवणूकदारांच्या विश्वासामुळे इन्फ्रा सेक्टर गेली कित्येक आठवडे तेजी दाखवत आहे. Nifty Infra Index सध्या त्याच्या सार्वकालिक उच्चांकावर आहे (9028.70, उच्चांक 9166.25) NCC, Bhel, Bel चांगलेच वधारतील असे वाटते. Power Sector ची अखंड घोडदौड ही ऊर्जेची प्रचंड मागणी या एका गोष्टीमुळे घडून येत आहे.

Strong Corporate Earnings ही बाबही अलीकडील तेजीला कारणीभूत ठरली. lT, Pharma, Banking या क्षेत्रांमधील बर्‍याच कंपन्यांनी खूपच चांगले आर्थिक निकाल दाखवले. Global Sentiments हा कोणत्याही देशाच्या शेअर बाजारातील चढ-उतारामागचा महत्त्वाचा फॅक्टर अलीकडे राहत आलेला आहे. रशिया, युक्रेन, इस्रायल-हमास यांच्यामध्ये संथ गतीने का होईना पण निवळत चाललेला तणाव, अमेरिका आणि चीनमध्ये Recovery होण्याची आशा आणि इथून पुढे व्याज दर न वाढवण्याचा फेडरल रिझर्व्हचा निर्णय या बाबींमुळे वैश्विक स्तरावर शेअर बाजारासाठी अनुकूल वातावरण सध्या आहे.

परेदशी गुंतवणूकदारांचे (FII) भारतीय बाजारातील Come back गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. गत सप्ताहातही 2030 कोटींची निव्वळ खरेदी भारतीय बाजारात केली. जोडीला DIIS ची अखंड खरेदी आहेच. 6300 कोटी रुपायांची निव्वळ खरेदी DIIS नी गतसप्ताहात केली. म्युच्युअल फंडांकडे जनतेचा प्रचंड ओघ सुरू आहे. SIP च्या वेगाने वाढणार्‍या बुक साईझमुळे दरमहा अमाप पैसा बाजारात येतो आहे आणि तेजीच्या वातावरणात नवनवीन कंपन्यांचे lPO बाजारात येत आहेत. अशा वातावरणात बाजारात तेजी टिकून राहण्याची शक्यता अधिक आहे.

येत्या काही दिवसांत नवीन सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल. पायाभूत विकास जोमदार करण्याचा निर्धार अर्थसंकल्पांतून व्यक्त होईल. पाठोपाठ रिझर्व्ह बँकेने व्याज दर कमी केले, तर सोने पे सुहागा मान्सूनच्या दमदार आगमनाने वातावरण अगोदरच उत्साहवर्धक आहे. पावसाळ्यानंतर सणासुदीचा हंगाम सुरू होईल. शहरी आणि ग्रामीण Consumption वाढेल. हाही घटक तेजी बळकट करेल.

सेन्सेक्स आज 77000 वर आहे. एक लाखाचा अभूतपूर्व टप्पा गाठण्यासाठी 23000 पॉईंटस्ची Massive Rally आवश्यक आहे. म्हणजे 30 टक्के वाढ! मार्च 2025 पर्यंत हे शक्य होईल काय?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news