पुढारी ऑनलाईन डेस्क
भारतीय शेअर बाजारातील आज शुक्रवारच्या (दि.२३) अस्थिर सत्रात भारतीय बेंचमार्क निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स (Sensex) आज ३३ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८१,०८६ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ११ अंकांनी वाढून २४,८२३ वर स्थिरावला. रियल्टी आणि आयटी शेअर्समध्ये आज सर्वाधिक घसरण दिसून आली. निफ्टी रियल्टी २.४ टक्क्यांनी तर निफ्टी आयटी १ टक्के घसरला.
क्षेत्रीय निर्देशांकात ऑटो निर्देशांक १ टक्के वाढून बंद झाला. तर मेटल, रियल्टी, मीडिया, पीएसयू बँक आणि आयटी ०.५ ते २.५ टक्क्यांपर्यंत घसरले. बीएसई मिडकॅप ०.६ टक्क्यांनी घसरला. तर स्मॉलकॅप शेअर्स सपाट पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, भारती एअरटेल, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स वाढले. तर एशियन पेंट्स, टायटन, इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
निफ्टी ५० ने आज ८०,८०० च्या पातळीवर व्यवहार केला. निफ्टीवर बजाज ऑटो, कोल इंडिया, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, सन फार्मा हा शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर LTIMindtree, विप्रो, डिव्हिस लॅब, टायटन, ओएनजीसी हे शेअर्स घसरले.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल आज शुक्रवारी होणाऱ्या भाषणात व्याजदरात कपातीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी निफ्टी आणि सेन्सेक्स सपाट झाले.