Stock Market Closing Bell | विक्रमी उच्चांकानंतर सेन्सेक्स, निफ्टी सपाट बंद, 'हे' शेअर्स तेजीत

शेअर बाजारात आज नेमकं काय घडलं?
Stock Market Sensex Nifty
सेन्सेक्स २३ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८१,३५५ वर बंद झाला. तर निफ्टी २४,८३६ वर स्थिरावला. file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजारात सोमवारी (दि.२९ जुलै) चढ-उतार दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात विक्रमी उच्चांक नोंदवल्यानंतर सेन्सेक्स, निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स (Sensex) २३ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८१,३५५ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) २४,८३६ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

Summary

ठळक मुद्दे

  • विक्रमी उच्चांक नोंदवल्यानंतर सेन्सेक्स, निफ्टी सपाट पातळीवर बंद

  • सेन्सेक्स २३ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८१,३५५ वर बंद.

  • निफ्टी २४,८३६ च्या सपाट पातळीवर स्थिरावला.

  • क्षेत्रीय निर्देशांकात आयटी, एफएमसीजी, टेलिकॉममध्ये घसरण.

  • ऑटो, बँक, मीडिया, कॅपिटल गुड्स, ऑईल आणि गॅस, पॉवर रियल्टीत वाढ.

  • बीएसई मिडकॅप ०.८ टक्क्यांनी, BSE SmallCap १.१ टक्क्यांनी वाढून बंद.

आशियाई बाजारातील तेजी आणि आयसीआयसीआय बँक शेअर्समधील (ICICI Bank) तेजीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्टीने सकाळच्या व्यवहारात नव्या उच्चांकाला स्पर्श केला होता. सेन्सेक्सने आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान ८१,९०८ चा नवा उच्चांक नोंदवला. तर निफ्टीने २४,९९९ च्या उच्चांकाला स्पर्श केला. पण त्यानंतर दोन्ही निर्देशांक उच्चांकावरुन माघारी परतले आणि सपाट पातळीवर बंद झाले.

Stock Market Sensex Nifty
TDS rate changes | टीडीएस-टीसीएस नियमात बदल, पगार, भाडे यावर कसा परिणाम होईल?

BSE SmallCap १.१ टक्क्यांनी वाढून बंद

क्षेत्रीय आघाडीवर आयटी, एफएमसीजी, टेलिकॉम प्रत्येकी ०.४ टक्क्यांनी घसरले. तर ऑटो, बँक, मीडिया, कॅपिटल गुड्स, ऑईल आणि गॅस, पॉवर आणि रियल्टी ०.५ ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढले. बीएसई मिडकॅप ०.८ टक्क्यांनी तर BSE SmallCap १.१ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

सेन्सेक्सवरील टॉप गेनर्स शेअर्स

सेन्सेक्सवर एलटी, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम, एसबीआय, रिलायन्स हे शेअर्स वाढले. आयसीआयसीआय बँकेचा शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे २ टक्क्यांनी वाढून १,२४२ रुपयांपर्यंत वाढला. त्यानंतर तो १,२११ रुपयांवर स्थिरावला. ICICI बँकेने पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त नफा नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा शेअर्स आज तेजीत राहिला. तर टायटन, भारती एअरटेल, कोटक बँक, आयटीसी, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले.

BSE Sensex
सेन्सेक्सवरील शेअर्सची आजची स्थिती.BSE

एनएसई निफ्टीवर बीपीसीएल, एलटी, डिव्हिस लॅब, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर टायटन, भारती एअरटेल, कोटक बँक, सिप्ला, आयटीसी हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले आहेत.

NSE Nifty
निफ्टी ५० चा आजचा ट्रेडिंग आलेख. NSE

बंधन बँकेचा शेअर्स टॉप गेनर

निफ्टी बँक आज ५२,३४० पर्यंत वाढला. निफ्टी बँकवर बंधन बँकेचा शेअर्स टॉप गेनर ठरला. हा शेअर १३ टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर पीएनबीचा शेअर्स सुमारे ६ टक्क्यांनी वाढला. बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक हे शेअर्सही तेजीत राहिले. बंधन बँकेने कमाई आणि नफ्यात वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली आहे.

Stock Market Sensex Nifty
मुलांसाठी ‘एनपीएस’ची नवी योजना, जाणून घ्या त्याविषयी

परदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीवर जोर

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात खरेदीवर जोर दिला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) शुक्रवारी २,५४६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर याच दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी २,७७४ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news