SBI Court Case: SBIला एक चूक पडली महागात; ग्राहकाला द्यावे लागणार तब्बल 1.7 लाख रुपये, काय आहे प्रकरण?

SBI compensation consumer court case: दिल्ली राज्य ग्राहक आयोगानं भारतीय स्टेट बँकेला (SBI) ग्राहकाला ₹1.7 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
SBI compensation consumer court case
SBI compensation consumer court casePudhari
Published on
Updated on

SBI Compensation Case: भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) एका छोट्या चुकीमुळे बँकेला तब्बल ₹ 1.7 लाखांचा फटका बसला आहे. दिल्ली राज्य ग्राहक आयोगाने बँकेविरुद्ध निर्णय देत ही रक्कम ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. बँकेने ग्राहकाच्या खात्यात पुरेसे पैसे शिल्लक असतानाही EMI बाउन्सचा दंड आकारला होता.

कार लोनपासून सुरू झालं प्रकरण

दिल्लीतील एका महिलेनं 2008 मध्ये एचडीएफसी बँकेतून ₹2.6 लाखांचं कार लोन घेतलं होतं. ईएमआय भरण्यासाठी तिनं एसबीआय खात्यातून ऑटो-डेबिट (ECS) सुविधा सुरू केली होती. दरमहा ₹7,054 इतकी रक्कम बँकेच्या खात्यातून आपोआप वळवली जाणार होती. मात्र, काही महिन्यांनी सलग 11 ईएमआय बाउन्स झाले आणि प्रत्येक वेळी बँकेने ₹400 दंड आकारला.

महिलेने जेव्हा बाउन्स नोटीस पाहिली, तेव्हा तिनं तातडीने बँक स्टेटमेंट तपासलं. स्टेटमेंटमध्ये स्पष्ट दिसत होतं की प्रत्येक महिन्यात तिच्या खात्यात पुरेशी रक्कम होती. तरीसुद्धा बँकेने 'अपुऱ्या शिल्लकचं' कारण देत दंड वसूल केला. महिलेने वारंवार बँकेशी संपर्क साधला, परंतु कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

SBI compensation consumer court case
Ajit Pawar Baramati Interviews: अजित पवार आज बारामतीत घेणार इच्छुकांच्या मुलाखती; नगराध्यक्षपदासाठी चुरस शिगेला

11 वर्षांचा कायदेशीर लढा

2010 मध्ये महिलेने जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली, पण तिथे तिचा दावा फेटाळला गेला. यानंतर तिनं राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे (NCDRC) धाव घेतली. तिथून केस पुन्हा दिल्ली राज्य ग्राहक आयोगाकडे पाठवण्यात आली. अखेर 9 ऑक्टोबर 2025 रोजी महिलेला न्याय मिळाला आणि आयोगाने निर्णय तिच्या बाजूने दिला.

SBIचे स्पष्टीकरण आणि आयोगाचा दणका

SBIनं म्हटलं की ECS मँडेटमध्ये चुकीची माहिती दिली होती, त्यामुळे व्यवहार फेल झाले. मात्र आयोगानं हा तर्क फेटाळला आणि म्हटलं की, “जर ECS चुकीचा असता, तर इतर ईएमआय व्यवस्थित कसे गेले?” बँक कोणताही ठोस पुरावा सादर करू शकली नाही की, ग्राहकाच्या खात्यात रक्कम नव्हती किंवा मँडेट चुकीचं होतं.

SBI compensation consumer court case
Delhi Bomb Blast: धक्कादायक खुलासा! तीन कारमधून देशभरात सिरीज ब्लास्टचा होता कट; कोणती शहरे होती हिट लिस्टवर?

ग्राहक अधिकारांवर आयोगाचा भर

आयोगानं आपल्या निर्णयात म्हटलं की “ग्राहकाच्या खात्यात पुरेसे पैसे असताना चुकून दंड आकारणे ही बँकेच्या सेवेतील गंभीर चूक आहे. बँकिंग संस्थांनी व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी दाखवली पाहिजे.” आता SBI बँकेला ₹1.7 लाख रुपयांची रक्कम ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news