SBI ग्राहकांनी नोंद घ्यावी! ८ जून रोजी रात्री काही वेळेसाठी डिजिटल सेवा बंद

SBI भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल तर ही महत्त्वाची माहिती आहे. बँकेच्या देखभाल व प्रणाली अद्ययावत करण्याच्या कामामुळे काही डिजिटल सेवा ८ जून २०२५ रोजी पहाटे काही काळासाठी बंद राहणार आहेत.
SBI Bank.jpg
SBI Bank.jpgSBI Bank.jpg
Published on
Updated on

SBI Digital Services Notice

भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल तर ही महत्त्वाची माहिती आहे. बँकेच्या देखभाल व प्रणाली अद्ययावत करण्याच्या कामामुळे काही डिजिटल सेवा ८ जून २०२५ रोजी पहाटे काही काळासाठी बंद राहणार आहेत. बँकेने ही माहिती अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे.

SBI Bank.jpg
Mukesh Ambani | मुकेश अंबांनी यांनी दिली 150 कोटी रूपयांची गुरूदक्षिणा! शिक्षकांच्या प्रेरणेसाठी अभूतपूर्व योगदान

बँकेने कळवले आहे की नियोजित देखभाल कार्यामुळे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), IMPS, YONO, रिटेल इंटरनेट बँकिंग, NEFT आणि RTGS या सेवा ८ जून रोजी पहाटे ३.४५ ते ४.३० या वेळेत उपलब्ध राहणार नाहीत. त्यानंतर सर्व सेवा सुरळीतपणे पुन्हा सुरू होतील.

बँकेने ग्राहकांना सल्ला दिला आहे की, या वेळेत आवश्यक व्यवहार आधीच पूर्ण करून घ्यावेत. तसंच, UPI Lite व ATM सेवा या वेळेत वापरण्याचीही सूचना देण्यात आली आहे.

SBI Bank.jpg
GST Council Meeting | 12 टक्के जीएसटी स्लॅब हटवण्याची शक्यता; अनेक वस्तू होणार स्वस्त...

UPI Lite चा वापर करून लहान रकमेचे व्यवहार UPI PIN शिवाय करता येतील. तर एटीएमच्या माध्यमातून रोख रक्कम काढणे व काही मूलभूत सेवा उपलब्ध असतील.

एसबीआयने स्पष्ट केले आहे की, ही देखभाल प्रक्रिया नेहमीच ठराविक कालावधीत केली जाते आणि यामुळे काही सेवा काही वेळेसाठी बंद ठेवण्यात येतात.

ग्राहकांनी आपल्या महत्त्वाच्या व्यवहारांपूर्वीच पूर्ण करून घ्यावेत, तसेच कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन एसबीआयने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news