

SBI New FD Interest Rate: जर तुम्ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI मध्ये एफडी ठेवण्याचा विचार करत असाल किंवा तुमची एफडी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एसबीआयने आपल्या ३ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त देशांतर्गत बल्क टर्म डिपॉझिटवरील काही काळासाठी व्याज दरात घट केली आहे.
१५ ऑगस्ट २०२६ पासून हे नवे व्याजदर लागू झाले आहेत. विशेष म्हणजे हे बदललेले व्याजदर हे प्रामुख्याने कमी कालावधीच्या बल्क एफडीवर लागू असणार आहेत. याचा परिणाम सामान्य ग्राहकांसोबतच वरिष्ठ नागरिकांच्या एफडीवर देखील पडणार आहे. एसबीआयने ३ कोटी रूपयांच्या सामान्य रिटेल एफडीवरील व्याजदरावर SBI ने कोणताही बदल केलेला नाही.
एसबीआयने ७ दिवसांपासून ते १७९ दिवसांच्या बल्क एफडीवरील व्याजदर २५ पाईंट्स म्हणजे ०.२५ टक्क्यांनी कमी केले आहेत. तर १८० ते २१० दिवसांच्या कालवाधीसाठीच्या एफडीवर १० बेसिस पॉईंट अर्थात ०.१० टक्के घट केली आहे. त्यानंतर आता २११ दिवसांपासून १० वर्षांर्यंतच्या बल्क एफडी व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचा अर्थ ज्या ग्राहकांची मोठी रक्कम एसबीआयमध्ये एफडीच्या स्वरूपात जमा आहे त्यांच्या व्याजदरात कोणताही बदल नाहीये.
या व्याजदराच्या बदलाचा परिणाम हा सिनियर सिटीजन यांच्यावर होण्याची शक्यता आहे वरिष्ट नागरिकांसाठीच्या ७ ते १७९ दिवसांच्या अवधीच्या बल्क एफडीवरील व्याज दर ०.२५ टक्क्यांनी तर १८० ते २१० दिवसांच्या अवधीसाठीच्या एफडीवरील व्याज दर ०.१० टक्क्यांनी घटवले आहेत. मात्र २११ दिवस ते १० वर्षे या अवधीसाठीच्या वरिष्ठ नागरिकांच्या बल्क एफडीवरील व्याजात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे नवे व्याजदर नवी एफडी करताना आणि जुनी एफडी मॅच्युर झाल्यानंतर ती रिन्यू करताना लागू होतील.
एसबीआयने बल्क डिपॉझिट मॅच्युरिटीच्या आधी काढण्यावर देखील नियम स्पष्ट केले असून वेळेआधीत तुम्ही ही एफडी मोडली तर त्यावर १ टक्के पेनल्टी लागू होणार आहे. हा नियम जमा होणारी रक्कम आणि रिन्यू होणाऱ्या नव्या एफडीवर देखील लागू होणार आहे.
३ कोटी रूपयांच्या आतील रक्कमेच्या एफडीबाबत बोलायचं झालं तर बँकेने या एफडीच्या व्याज दरांवर कोणताही बदल केलेला नाही. सध्याच्या माहितीनुसार सामान्य ग्राहकांसाठी एसबीआयच्या रिटेल एफडीवर ३.०५ टक्क्यांपासून ६.४० टक्क्यांपर्यंत व्याजदर लागू आहेत. सिनिअर सिटीझनसाठी हेदर ३.५५ टक्क्यांपासून ७.०५ टक्क्यांपर्यंत आहेत.
एसबीआयचे नवे व्याजदर हे ३ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रूपयांची एफडी असलेल्या मोठ्या गुंतवणूकदारांसाठीच लागू असणार आहेत. त्यापेक्षा छोट्या एफडीवरील व्याजदरात सध्या तरी कोणता बदल करण्यात आलेला नाही.