Salary Hike 2026: खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात किती टक्के वाढ होणार? कोणत्या क्षेत्रात जास्त वाढ?

Private Sector Salary Hike 2026: EY च्या अहवालानुसार 2026 मध्ये खासगी क्षेत्रातील पगारात सरासरी 9.1% वाढ होण्याची शक्यता आहे. कंपन्या अनुभवाऐवजी कौशल्य आणि कामगिरीवर आधारित वेतनवाढ देण्याकडे वळत आहेत.
Private Sector Salary Hike 2026
Private Sector Salary Hike 2026Pudhari
Published on
Updated on

Private Sector Salary Hike 2026: मार्च महिना जवळ आला की कर्मचाऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू होते, यंदा पगारवाढ किती होणार? तंत्रज्ञान, ई-कॉमर्स किंवा फार्मा क्षेत्र असो, सर्वच क्षेत्रातील कर्मचारी चांगल्या पगार वाढीची अपेक्षा ठेवून आहेत. अशातच EY च्या ‘फ्यूचर ऑफ पे 2026’ अहवालाने यंदाच्या वेतनवाढीबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

अहवालानुसार, 2026 मध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 9.1 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त मानली जात आहे. मात्र, सर्वांना समान वाढ मिळेल असे नाही. कंपन्या आता कौशल्य, कामगिरी आणि कर्मचाऱ्याने दिलेले योगदान या निकषांवर वेतनवाढ देत आहेत.

अनुभवापेक्षा कौशल्याला प्राधान्य

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, कंपन्या हळूहळू त्यांची वेतन संरचना (कंपेन्सेशन फ्रेमवर्क) बदलत आहेत. आता फक्त पद किंवा अनुभवावर पगार वाढणार नाही, तर कर्मचारी कंपनीसाठी किती उपयुक्त आहे आणि त्याने किती चांगले काम केल आहे, त्याचा फायदा कंपनीला झाला का, यावर भर दिला जाणार आहे. सुमारे अर्ध्या कंपन्या स्किल-बेस्ड पे मॉडेल स्वीकारत आहेत किंवा ते लागू करण्याच्या तयारीत आहेत.

कोणत्या क्षेत्रात जास्त वाढ?

यंदा ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) मध्ये सर्वाधिक वेतनवाढ होण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रात सरासरी 10.4% वाढ होऊ शकते. डिजिटल आणि टेक्नॉलॉजी, वित्तीय सेवा, ई-कॉमर्स आणि लाइफ सायन्सेस-फार्मा क्षेत्रात 9.7% ते 10% दरम्यान वाढ अपेक्षित आहे. यावरून टेक्नॉलॉजी, फायनान्स, ऑनलाइन व्यवसाय आणि हेल्थकेअर क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मागणी कायम असल्याचे दिसून येते.

Private Sector Salary Hike 2026
Gen Z Debt Trap: 30 हजार पगार… 40 लाखांचं कर्ज! Gen Z कर्जाच्या जाळ्यात कसे अडकत आहेत? कारण काय?

एट्रिशनमध्ये घट

अहवालानुसार, नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण (एट्रिशन रेट) कमी होत आहे. 2025 मध्ये एकूण एट्रिशन दर 16.4% वर आला, जो 2024 मध्ये 17.5% होता. याचा अर्थ रोजगार बाजार पूर्वीपेक्षा अधिक स्थिर होत आहे. मात्र, 80% पेक्षा जास्त कर्मचारी स्वेच्छेने नोकरी बदलत आहेत.

फायनान्स क्षेत्रात सर्वाधिक 24% एट्रिशन आहे, तर प्रोफेशनल सर्व्हिसेस आणि आयटी क्षेत्रातही नोकरी सोडण्याचे प्रमाण जास्त आहे. तुलनेत GCC मध्ये एट्रिशन दर सुमारे 14.1% इतका कमी आहे.

या अहवालात भारतातील 16 विविध क्षेत्रांतील 178 कंपन्यांचा डेटा गोळा करण्यात आला आहे. त्यामुळे वेतनवाढीचा अंदाज सर्वेक्षणावर आधारित असल्याचे सांगितले जाते. कंपन्या आता बाजारातील स्पर्धा, खर्च आणि टॅलेंट टिकवून ठेवण्याची गरज लक्षात घेऊन वेतन धोरण ठरवत आहेत.

Private Sector Salary Hike 2026
Gen Z Trend: नोकरी लागताच सर्वात अगोदर Zen Z काय खरेदी करत आहेत? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

जगाच्या तुलनेत भारत आघाडीवर

2026मध्ये भारतातील 9.1% वेतनवाढीचा अंदाज हा अनेक विकसित देशांच्या तुलनेत जास्त आहे. अमेरिकेत सुमारे 4.3%, युनायटेड किंगडममध्ये 4.1%, जर्मनीत 3.9%, जपानमध्ये 3.7% आणि चीनमध्ये 4.8% वाढीचा अंदाज आहे.

तसेच भारताची GDP वाढ 6.2% राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे, जी अनेक विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत दुप्पट आहे. यावरून भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे आणि कौशल्याधारित कर्मचाऱ्यांची मागणी कायम असल्याचे हे संकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news