

Best SIP Long Term Investment India: शेअर बाजारात गुंतवणूक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम ठेवणे. आज अनेक लोक SIP सुरू करतात, पण काही महिन्यांतच थांबवतात. बाजार थोडा घसरला की घाबरून पैसे काढून घेतात. अशावेळी त्यांना भविष्यात मिळणाऱ्या रिटर्नचा फायदा होत नाही.
याच गोष्टीचा पुरावा म्हणजे निप्पॉन इंडिया व्हिजन लार्ज & मिड कॅप फंडचा जबरदस्त रिटर्न. हा फंड भारतातील सर्वांत जुन्या आणि सक्रिय इक्विटी फंडपैकी एक आहे. 8 ऑक्टोबर 1995 रोजी सुरू झालेल्या या फंडात एखाद्या गुंतवणूकदाराने त्या दिवशी फक्त ₹1,000 ची मासिक SIP चालू केली असती तर त्याची आज किंमत ₹1.13 कोटी झाली असती.
यात गुंतवणूकदाराने फक्त ₹3.60 लाख रुपये गुंतवणूक केली होती. अट फक्त एकच होती 30 वर्षे न थांबता गुंतवणूक सुरू ठेवणे. या फंडने अनेक वर्षांत चांगला आणि स्थिर परतावा दिला आहे. काही वेळा बाजार खाली आला, तोटा झाला, पण ज्यांनी गुंतवणूक कायम ठेवली, त्यांना फायदा झाला. 2017मध्ये 41% च्या वर परतावा मिळाला तर 2018 मध्ये काहीशी घसरण झाली. पण दीर्घकालीन परफॉर्मन्सकडे बघितले तर या फंडने गुंतवणूकदारांना 18.44% CAGR परतावा दिला आहे.
या फंडच्या पोर्टफोलिओवर नजर टाकली तर Reliance Industries, HDFC Bank आणि ICICI Bank सारख्या देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांच्या कमाई व वाढीमुळे फंड अधिक वाढला आहे. त्यामुळे भविष्यातही स्थिर आणि चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की, SIP थांबवू नका. बाजारात चढ-उतार असतील, बातम्या नकारात्मक असतील, कधी पोर्टफोलिओ कमी होताना दिसेल. पण गुंतवणूक चालू ठेवा. वेळेनुसार पैसा वाढत जातो.
महत्त्वाचं म्हणजे, गुंतवणुकीची प्रत्येक योजना गुंतवणूकदाराच्या गरजा, जोखीम घेण्याची क्षमता आणि कालावधी यावर अवलंबून असते. त्यामुळे कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.