RBI Repo Rate Hike: सणासुदीआधी कर्जदारांना झटका! 20, 30 आणि 50 लाखांच्या होम लोनचा EMI किती वाढणार?

RBI Repo Rate Hike: RBIने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटची वाढ केल्याने रेपो रेट 5.25% वरून 5.50% झाला आहे. या निर्णयाचा परिणाम फ्लोटिंग रेटवरील होम लोनच्या EMIवर होऊ शकतो.
RBI Repo Rate Hike
RBI Repo Rate HikePudhari
Published on: 
Updated on: 

RBI Repo Rate Hike: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट 5.25 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी तीन दिवसांच्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर या निर्णयाची माहिती दिली.

रेपो रेट वाढल्याचा थेट परिणाम कर्जाच्या व्याजदरावर होऊ शकतो. विशेषतः फ्लोटिंग रेटवर होम लोन घेतलेल्या ग्राहकांच्या EMIमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे घर, कार किंवा वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडू शकतो.

मात्र, तुमच्या होम लोनचा EMI नेमका किती वाढेल, हे कर्जाची रक्कम, व्याजदर आणि उर्वरित कालावधी यावर अवलंबून असतो. 20 वर्षांच्या कालावधीसाठी 7.50 टक्के व्याजदर असलेल्या होम लोनवर 0.25 टक्क्यांची वाढ झाल्यास EMIमध्ये किती फरक पडतो, ते पाहूया.

20 लाखांच्या होम लोनवर EMI किती वाढणार?

समजा, तुम्ही 20 लाख रुपयांचे होम लोन घेतले आहे. या कर्जाचा व्याजदर 7.50 टक्के असून कालावधी 20 वर्षांचा आहे. या दराने तुमचा मासिक EMI सुमारे 16,112 रुपये होतो. आता व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ होऊन तो 7.75 टक्के झाल्यास EMI सुमारे 16,419 रुपये होईल. म्हणजेच तुमच्या EMIमध्ये दरमहा सुमारे 307 रुपयांची वाढ होईल.

30 लाखांच्या होम लोनवर किती वाढणार EMI?

जर 30 लाख रुपयांचे होम लोन 20 वर्षांसाठी 7.50 टक्के व्याजदराने घेतले असेल, तर सध्याचा EMI सुमारे 24,168 रुपये आहे. व्याजदर 7.75 टक्के झाल्यानंतर हा EMI सुमारे 24,628 रुपये होईल. म्हणजेच दरमहा सुमारे 460 रुपये जास्त भरावे लागतील.

50 लाखांच्या होम लोनवर किती वाढणार EMI?

आता 50 लाख रुपयांच्या होम लोनचा विचार करूया. 20 वर्षांच्या कालावधीसाठी 7.50 टक्के व्याजदर असल्यास मासिक EMI सुमारे 40,280 रुपये होते. व्याजदर 7.75 टक्के झाल्यानंतर EMI सुमारे 41,047 रुपये होईल. याचा अर्थ दरमहा सुमारे 767 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

RBI Repo Rate Hike
RBI Repo Rate Hike: कर्जदारांना मोठा धक्का! 44 महिन्यांनंतर RBI ने वाढवला रेपो रेट; तुमच्या EMIवर होणार थेट परिणाम

EMIमध्ये किती फरक पडणार?

RBI Repo Rate Hike
RBI Repo Rate HikePudhari

EMI कसा मोजला जातो?

होम लोनचा EMI मोजण्यासाठी खालील सूत्र वापरले जाते:

EMI = P × R × (1+R)^N / [(1+R)^N - 1]

यामध्ये P म्हणजे कर्जाची रक्कम, N म्हणजे कर्जाचा कालावधी महिन्यांमध्ये आणि R म्हणजे मासिक व्याजदर. मासिक व्याजदर काढण्यासाठी वार्षिक व्याजदराला 12 आणि 100 ने भागले जाते.

RBI Repo Rate Hike
Gold Silver Prices Today: सोन्याला उतरती कळा; चांदीने मात्र भाव खाल्ला, खरेदीची ही योग्य वेळ आहे का?

जवळपास चार वर्षांनंतर रेपो रेटमध्ये वाढ

RBIने जवळपास चार वर्षांनंतर रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेट वाढवण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात रेपो रेटमध्ये विविध बदल झाले असले तरी, मागील तीन MPC बैठकींमध्ये तो 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला होता.

महत्त्वाचे: वरील EMI 20 वर्षांचा कालावधी आणि 7.50 टक्क्यांवरून 7.75 टक्के झालेला व्याजदर गृहीत धरून केलेली आहे. प्रत्यक्ष EMIमध्ये बदल हा तुमच्या बँकेचा व्याजदर, कर्जाचा उर्वरित कालावधी आणि कर्जाच्या अटींनुसार वेगळा असू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news