RBI MPC Meeting: इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर RBI चा मोठा निर्णय; तुमचा EMI कमी झाला का?

RBI MPC Meeting Updates: इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर आज RBI ने मॉनेटरी पॉलिसी जाहीर केली आहे. रेपो रेटच्या बदलाचा तुमच्या EMI वर थेट परिणाम होऊ शकतो.
RBI MPC Meeting 2026 Live Updates
RBI MPC Meeting 2026 Live UpdatesPudhari
Published on
Updated on

RBI MPC Meeting Updates: मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज Reserve Bank of India कडून महत्त्वाच्या मॉनेटरी पॉलिसीचा निर्णय जाहीर झाला आहे. 2026 या कॅलेंडर वर्षातील ही दुसरी पॉलिसी असून FY27 साठीची ही पहिली बैठक होती. त्यामुळे या निर्णयाकडे गुंतवणूकदारांसह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले होते.

या बैठकीत सर्वात मोठं आव्हान म्हणजे इराणमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे अमेरिका आणि इराण यांनी दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. तसेच स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा सुरू करण्यासही सहमती दर्शवली आहे. यामुळे तेलाच्या पुरवठ्यातील अडथळे कमी होण्याची शक्यता आहे.

सामान्य लोकांसाठी मात्र या पॉलिसीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा एकच असतो – EMI कमी होणार का? याचे उत्तर थेट Repo Rate वर अवलंबून असते. जर RBI ने रेपो रेटमध्ये कपात केली, तर बँकांचे कर्ज स्वस्त होण्याची शक्यता असते आणि त्याचा फायदा थेट गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या EMI मध्ये दिसून येतो. आज आरबीआयने रेपो दर ५.२५% वर कायम ठेवला आहे. त्यामुळे रेपो दरात कोणताही बदल झाला नाही. परिणामी सामान्य लोकांसाठी EMI जसे आहेत तसेच राहणार आहेत.

RBI MPC Meeting 2026 Live Updates
RBI Report India Aging Population: भारतात वाढते वृद्धत्व, ‘तरुणांचा देश’ ही ओळख धोक्यात; RBI चा इशारा

मागील काही महिन्यांचा विचार केला तर फेब्रुवारी 2026 मध्ये RBI ने रेपो रेट 5.25% वर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी डिसेंबर 2025 मध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात करत तो 5.50% वरून 5.25% करण्यात आला होता. तसेच जून 2025 मध्येही 50 बेसिस पॉइंट्सची मोठी कपात करण्यात आली होती.

RBI MPC Meeting 2026 Live Updates
RBI Action: धक्कादायक! महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला RBIने ठोकले ताळे; ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

आजच्या बैठकीत RBI ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही, त्यामुळे सर्वसामान्यांच्या EMI मध्ये तात्काळ कोणताही फरक पडणार नाही. या निर्णयाचा परिणाम फक्त कर्जदारांपुरता मर्यादित नसून शेअर बाजारावरही होतो.

एकूणच, महागाई, कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक परिस्थिती या सर्वांचा विचार करून RBIने आज निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमच्या खिशावर आणि गुंतवणुकीवर याचा थेट परिणाम होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news