Post Office Saving Scheme : महिन्याला ६१ हजारांची कमाई, ही सरकारी स्कीम तुम्हाला बनवू शकते करोडपती

पोस्ट ऑफिस अनेक सरकारी योजाना चावलते. सेव्हिंगवर पोस्ट ऑफिस चांगला व्याजदरासह चांगला परतावा देखील देते.
Post Office Saving Scheme
Post Office Saving SchemePudhari Photo
Published on
Updated on

Post Office Saving Scheme Benefits What Is 15+5+5 Strategy :

पोस्ट ऑफिस अनेक सरकारी योजाना चावलते. सेव्हिंगवर पोस्ट ऑफिस चांगला व्याजदरासह चांगला परतावा देखील देते. त्यांची अशीच एक पब्लिक प्रोविडंट फंड (PPF) योजना आहे. ही अशी योजना आहे जी लोकांना करोडपती देखील बनवू शकते. मात्र यासाठी दीर्घ काळ गुंतवणूक करावी लागलते. जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तुमच्यासाठी ही योजाना चांगल्या व्याजदर देणारी ठेरू शकते. यात टॅक्स बेनिफिट देखील मिळतो. चला तर मग जाणून घेऊयात पोस्टाची ही पीपीएफची योजना काय आहे.

Post Office Saving Scheme
Drishti IAS Advertisement : चुकीची माहिती पसरवली.... विकास दिव्यकिर्ती यांच्या Drishti IAS संस्थेला ठोठावला दडं; नेमकं काय आहे प्रकरण?

काय आहे योजाना

पीपीएफ योजनेत तुम्ही 15+5+5 अशी रणनितीनं गुंतवणूक करू शकता. यामुळं २५ वर्षात साधारणपणे १.०३ कोटी रूपये फंड जमा होऊ शकतो. तसेच या रकमेवर मिळणाऱ्या व्याजापोटी महिन्याला ६१ हजार रूपये देखील मिळतील.

पब्लिक फ्रोविडंट फंड वर्षाला ७.१ टक्के व्याजदर मिळतो. तसंच पीपीएफमधील गुंतवणूक ही इनकम टॅक्स अधिनियम ८०सी अतंर्गत येणाऱ्या दीड लाखाच्या टॅक्स सूट स्लॅबमध्ये येते. त्यामुळं तुम्हाला टॅक्समध्ये देखील सूट मिळते.

कसं व्हाल करोडपती?

जर तुम्हाला तुमच्या निवृत्तीपर्यंत मोठी रक्कम जमा करायची आहे तर तुम्ही पीपीएफ मध्ये 15+5+5 अशी रणनितीनं गुतवणूक करू शकता. यात तुम्ही कमीतकमी १५ वर्षे गुंतवणूक करायची आहे. जर तुम्ही सलग १५ वर्षे पीपीएफमध्ये गुंतवणूक केली. त्यानंतर ५ वर्षाचे दोन एक्स्टेंशन घेतले तर एकूण २५ वर्षे तुम्ही इनव्हेस्टेड राहता.

अशा गुंतवणुकीतून १.०३ कोटी रूपये फंड निर्माण होऊ शकतो. या फंडातील गुंतवणुकीद्वारे तुम्हाला दर महा ६१ हजार रूपये मिळू शकतात.

यासाठी तुम्हाला १५ वर्षासाठी प्रत्येक वर्षी दीड लाख रूपये पीपीएफमध्ये गुंतवावे लागतील. म्हणजे तुमची १५ वर्षाची गुंतवणूक ही २२.५ लाख रूपये गुंतवणूक होईल. ७.१ टक्के व्याज दरानुसार १५ वर्षात तुमची ही गुंतवणूक ४०.६८ लाख रूपये होईल. तुम्हाला १८.१८ लाख रूपये व्याज मिळेल.

जर तुम्ही ही रक्कम अजून पाच वर्षासाठी गुंतवली तर २० वर्षानंतर तुमचा एकूण फंड हा ५७.३२ लाख रूपये इतका होईल. त्यावर १६.६८ टक्के व्याज जोडलं जाईल. हीच रक्कम तुम्ही अजून पाच वर्षे म्हणजे एकूण २५ वर्षे गुंतवली तर तुमची एकूण रक्कम ही ८०.७७ लाख रूपये होते. यातील व्याजाची रक्कम ही २३.४५ लाख रूपये होईल.

जर तुम्ही या १५ ऐवजी अजून १० वर्षे म्हणजे एकूण २५ वर्षे वर्षाला दीड लाखाची गुंतवणूक पीपीएफमध्ये करत राहिलात तर तुमचा फंड हा १.०३ कोटी रूपये इतका होईल.

Post Office Saving Scheme
Shoaib Malik Divorce : सानिया मिर्झाच्या ex-husband ला संसार काही जमेना.. शोएब मलिक तिसऱ्या पत्नीसोबतही घेणार घटस्फोट?

कसे मिळणार महिन्याला ६१ हजार रूपये?

वरील फॉर्म्युल्यानुसार पीपीएफमधील गुंतवणुकीला २५ वर्षे पूर्ण झाल्यावर तुमच्या अकाऊंटमध्ये १.०३ कोटी रूपये फंड तयार होईल. हा फंड तुम्ही न काढता तसाच ठेवला तर त्यावर तुम्हाला प्रत्येक वर्षाला ७.१ टक्के व्याज मिळेल. व्याजाची ही रक्कम ७.३१ लाख रूपये होते. याचा अर्थ महिन्याला तुम्हाला जवळपास ६० हजार ९४१ रूपये मिळतील.

कोण करू शकतं पीपीएफमध्ये गुंतवणूक?

पीपीएफमध्ये कोणीही गुतंवणूक करू शकतो. जर तुम्ही अल्पवयीन असाल तर तुमच्या पालकांच्या मदतीनं तुम्ही ही गुंतवणूक करू शकता. पीपीएफ अकाऊंट उघडण्यासाठी किमान ५०० रूपये लागतील. तुम्हाला जॉईंट खातं उघडता येत नाही. हे फक्त व्यक्तिगत खातं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news