

Drishti IAS Advertisement :
केंद्रीय उपभोक्ता संरक्षण प्राधिकरण (CCPA) यांनी दृष्टि IAS यांच्यावर ५ लाख रूपयाचा दंड लावला आहे. त्यांनी दृष्टि IAS ने चुकीचा प्रचार केल्याचा ठपका ठेवला आहे. युपीएससी सेवा परीक्षा २०२२ च्या निकालाबाबत भ्रम पसरवणारी जाहीरात केल्याचा आरोप दृष्टि IAS ने केला आहे.
सीसीपीए यांनी दृष्टि IAS संस्थेनं परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे संस्थेचे योगदान आणि सिलॅबस बाबतची माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण गेल्यावर्षीचं आहे. याबाबत तक्रार करण्यात आली होती. गेल्या वर्षी देखील असे प्रकरण या संस्थेबाबत घडलं होतं. आता सीसीपीएनं जाहीरात देताना संस्थांना संपूर्ण माहिती देणं बंधनकारक केलं आहे.
संस्थेने यूपीएससी सीएसई २०२२ मध्ये आपल्या कोचिंगमधून २१६ उमेदवार यशस्वी झाल्याचा दावा केला होता. सीसीपीएच्या तपासणीत उघड झाले की या २१६ उमेदवारांपैकी १६२ (७५%) उमेदवारांनी केवळ मोफत 'इंटरव्यू प्रॅक्टिस' (मुलाखत सराव) कार्यक्रमात भाग घेतला होता. हा कार्यक्रम पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर घेतला जातो. केवळ ५४ विद्यार्थ्यांनीच संस्थेच्या IGP+ इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला होता.
पीआयबी (PIB) नुसार, संस्थेने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा प्रकार आणि कालावधी यासंबंधीची महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक लपवली. यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना संपूर्ण यशाचे श्रेय दृष्टी आयएएसलाच आहे, असा गैरसमज झाला. सीसीपीएने ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ च्या कलम २(२८) नुसार हे 'भ्रामक जाहिरात' असल्याचे स्पष्ट केले.
सीसीपीएने नमूद केले की, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसाठी दृष्टी आयएएसवर केलेली ही दुसरी दंडनीय कारवाई आहे. यापूर्वी, सप्टेंबर २०२४ मध्ये, संस्थेने यूपीएससी सीएसई २०२१ मध्ये १५०+ विद्यार्थ्यांच्या निवडीचा खोटा दावा केला होता. तेव्हाही, निवड झालेल्या १६१ उमेदवारांपैकी बहुतांश (१४८) फक्त इंटरव्यू गाईडन्स प्रोग्राम (IGP) मध्ये होते, मुख्य फाऊंडेशन अभ्यासक्रमात नव्हते. या प्रकरणी सीसीपीएने ₹ ३ लाखांचा दंड ठोठावला होता आणि जाहिरात थांबवण्याचे निर्देश दिले होते. या स्पष्ट इशाऱ्यानंतरही, संस्थेने २०२२ च्या निकालांसाठी पुन्हा तोच खोटा दावा केल्याचे समोर आले आहे.
सीसीपीएने आत्तापर्यंत विविध कोचिंग संस्थांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी ५४ नोटीस जारी केल्या आहेत. एकूण २६ कोचिंग संस्थांवर ९०.६ लाखांपेक्षा जास्त दंड आकारण्यात आला आहे आणि त्यांना असे दिशाभूल करणारे दावे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
अशा सर्व संस्थांनी यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमांची महत्त्वाची माहिती लपवल्याचे सीसीपीएने आपल्या तपासणीत आढळले आहे, जे ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन आहे.
अशा प्रकारे, कोचिंग संस्थांकडून माहिती लपवली गेल्यामुळे विद्यार्थी आणि पालक योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत आणि मोठ्या दाव्यांनी प्रभावित होऊन गैरसमजात फसतात.