Paytm Impact: Paytm पेमेंट्स बँक बंद झाल्यानंतर तुमच्या EMI, SIP आणि OTT पेमेंटचं काय होणार? जाणून घ्या सर्व माहिती

Paytm Payments Bank impact: भारतीय रिझर्व्ह बँकेने Paytm Payments Bank चा परवाना रद्द केल्यानंतर EMI, SIP आणि OTT ऑटो-पेमेंटवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Paytm Payments Bank impact
Paytm Payments Bank impactPudhari
Published on
Updated on

Paytm Payments Bank impact: भारतीय रिझर्व्ह बँकेने Paytm Payments Bank चा परवाना रद्द केल्यानंतर लाखो ग्राहकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः ज्यांनी आपल्या EMI, SIP आणि OTT सबस्क्रिप्शनसाठी या बँकेचं खाते ऑटो-डेबिटसाठी जोडलेलं आहे, त्यांच्यासमोर आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

सर्वात मोठा परिणाम कर्जाचा EMI भरणाऱ्या ग्राहकांवर होऊ शकतो. जर तुमच्या लोनचा EMI Paytm Payments Bank खात्यातून ऑटो-डिडक्ट होत असेल, तर आता EMI वेळेवर खात्यातून जाणार नाही. त्यामुळे लेट फी लागू शकते आणि तुमच्या CIBIL स्कोअरवरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी तातडीने आपल्या बँकेकडे किंवा लोन कंपनीकडे नवीन बँक खाते अपडेट करणं आवश्यक आहे.

Paytm Payments Bank impact
AI FASTag Toll: फास्टॅग + AIची कमला! टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही; न थांबता टोल कापला जाणार, काय आहे सरकारचा प्लॅन?

याचप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये SIP करणाऱ्या गुंतवणूकदारांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर SIP साठी Paytm Payments Bank खाते लिंक असेल, तर हप्ता वेळेवर कट होणार नाही. त्यामुळे गुंतवणुकीची शिस्त बिघडू शकते. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी त्वरित आपल्या AMC किंवा गुंतवणूक प्लॅटफॉर्मवर जाऊन नवीन बँक मँडेट अपडेट करावं.

OTT आणि डिजिटल सबस्क्रिप्शन सेवांवरही याचा परिणाम होऊ शकतो. Netflix, Spotify किंवा Amazon Prime Video सारख्या सेवांचे ऑटो-पेमेंट फेल होऊ शकतात. त्यामुळे तुमचं सबस्क्रिप्शन तात्पुरतं बंद होण्याची शक्यता आहे. नवीन पेमेंट मोड जोडल्याशिवाय या सेवा पुन्हा सुरू होणार नाहीत.

Paytm Payments Bank impact
Paytm Share Crash: RBIच्या एका निर्णयाने Paytm हादरलं! काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5,800 कोटी रुपये बुडाले

मात्र या सगळ्या गोंधळात एक मोठा दिलासा म्हणजे ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचं RBI ने स्पष्ट केलं आहे. बँक बंद करण्याच्या प्रक्रियेदरम्यान एक लिक्विडेटर नियुक्त केला जाईल. तो सर्व खात्यांची पडताळणी करून ग्राहकांचे पैसे त्यांच्या पर्यायी बँक खात्यात ट्रान्सफर करेल.

दरम्यान, Paytm ने स्पष्ट केलं आहे की त्यांचं मुख्य अॅप आणि UPI सेवा सुरूच राहणार आहेत. कारण या सेवा इतर बँकांच्या भागीदारीत चालवल्या जातात. त्यामुळे ग्राहक पूर्वीप्रमाणे UPI व्यवहार करू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news