Union Budget 2026 Health news | भारत औषध निर्मितीचे हब बनणार ! मधुमेह, कॅन्सरची औषधं होणार स्वस्त; अर्थसंकल्पात मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग नवव्यांदा लोकसभेत 2026-27 मांडत आहेत
Union Budget 2026 Health news | भारत औषध निर्मितीचे हब बनणार ! मधुमेह, कॅन्सरची औषधं होणार स्वस्त; अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 2026-27 आज (1 फेब्रुवारी ) संसदेत सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग नवव्यांदा लोकसभेत 2026-27 मांडण्यास सुरुवात केली. संत रविदास जयंतीच्या देशवासियांना शुभेच्छा देत सितारमण यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. या आध्यात्मिक संदर्भाने त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची औपचारिक सुरुवात केली.

Union Budget 2026 Health news | भारत औषध निर्मितीचे हब बनणार ! मधुमेह, कॅन्सरची औषधं होणार स्वस्त; अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Union Budget 2026 : स्वतंत्र भारतातील असे दोन अर्थमंत्री, जे अर्थसंकल्प सादर करू शकले नाहीत… त्यामागे होते मोठे कारण

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सितारमण यांनी देशातील मधुमेह, कॅन्सर सारख्या आजारांची भीषणता लक्षात घेत, महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी दुर्धर आजारांसाठी कमी दरात औषधं उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशात मधुमेह, कॅन्सर आजारावरची औषधं स्वस्त करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

Union Budget 2026 Health news | भारत औषध निर्मितीचे हब बनणार ! मधुमेह, कॅन्सरची औषधं होणार स्वस्त; अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Union Budget 2026 | कर्तव्य भवनात सादर झालेला पहिला अर्थसंकल्प, सरकारची तीन कर्तव्ये…

बायोफॉर्मासाठी १० हजार कोटी निधीची तरतूद

तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात भारताला जागतिक बायोफॉर्मा मॅन्युफॅक्चरिंग हब (Bio-Pharma Manufacturing Hub) बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशात बायोफॉर्मा क्षेत्रातील संशोधन, विकास आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने १०,००० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश भारताला औषध निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण बनवणे आणि जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा वाढवणे हा आहे. या गुंतवणुकीमुळे केवळ औषध निर्मितीच नाही, तर आरोग्य तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना देखील मोठी मदत मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवले जात आहेत.

आरोग्यसंदर्भात बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा

  • भारतात 3 नवीन आयुर्वेदीक संस्थान तयार केले जातील.

  • आम्ही उच्च दर्जाचे आयुर्वेदिक उत्पादने निर्यात करू.

  • तरुणांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक योजना सुरू केली जाईल.

  • पुढील पाच वर्षांत एक लाख तज्ञ आरोग्य व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले जाईल. १.५ लाख काळजी वाहकांना प्रशिक्षण दिले जाईल.

  • भारतीय योगाचा जगभरात प्रसार करण्यासाठी आम्ही दर्जेदार आयुर्वेदिक उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊ.

  • आयुर्वेदिक औषधांच्या चाचणीसाठी राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन केल्या जातील.

  • देशात तीन नवीन आयुर्वेदिक एम्स बांधले जातील.

  • जामनगरमध्ये WHO पारंपारिक औषध केंद्र स्थापन केले जाईल.

  • जामनगरमध्ये एक आयुर्वेदिक वैद्यकीय केंद्र स्थापन केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news