MS Dhoni: ‘कॅप्टन कूल’ पुन्हा नंबर वन! बिहार-झारखंडमध्ये महेंद्रसिंह धोनी ठरला सर्वाधिक करदाता

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बिहार-झारखंड आयकर क्षेत्रात धोनी पुन्हा एकदा 'सर्वात मोठा वैयक्तिक करदाता' ठरला आहे.
MS Dhoni
MS Dhonifile photo
Published on
Updated on

MS Dhoni

रांची: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मैदानाप्रमाणेच आर्थिक क्षेत्रातही आपले वर्चस्व कायम राखले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बिहार-झारखंड आयकर क्षेत्रात धोनी पुन्हा एकदा 'सर्वात मोठा वैयक्तिक करदाता' ठरला आहे. झारखंड आणि बिहारचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त डॉ. डी. सुधाकर राव यांनी गुरुवारी रांची येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, गोपनीयतेच्या कारणास्तव धोनीने नेमका किती कर भरला, याचा आकडा जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला.

आयकर आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या तुलनेत झारखंडमधून अधिक कर संकलित झाला आहे. एकूण २० हजार कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी सुमारे १२ हजार कोटी रुपये झारखंडमधून, तर ८ हजार कोटी रुपये बिहारमधून जमा झाले आहेत. आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी देखील २० हजार कोटींच्या कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

MS Dhoni
IPL 2026: IPL मध्ये खळबळ! स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडकडून टीमची माहिती लीक? हनी ट्रॅपचा प्रकार; BCCIने घेतला मोठा निर्णय

करचोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई

गेल्या आर्थिक वर्षात करचोरीच्या प्रकरणांत विभागाने मोठी कारवाई केली आहे. सुमारे १२ मोठ्या व्यावसायिक समूहांवर छापे टाकण्यात आले असून यामध्ये १५० हून अधिक व्यापाऱ्यांचा समावेश होता. याशिवाय, बिहार आणि झारखंडमध्ये करचोरी आणि विवरणपत्र न भरल्याप्रकरणी ९० हून अधिक व्यक्ती आणि संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

५ कोटी पॅनकार्डधारक, पण केवळ ४० लाख करदाते

बिहार-झारखंडमध्ये पॅनकार्ड धारकांची संख्या सुमारे ५ कोटींच्या घरात आहे, मात्र त्यातील केवळ ४० लाख लोक नियमितपणे आयकर परतावा दाखल करतात. या ४० लाख लोकांपैकी प्रत्यक्ष कर भरणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्के आहे. दरम्यान, एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या 'नवीन आयकर कायदा २०२५' मधील तरतुदींची माहिती देण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स आणि व्यापारी संघटनांसोबत बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती डॉ. राव यांनी दिली.

कर संकलनात ५ टक्क्यांची घट

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये कर संकलनात ५ टक्क्यांची घट झाली आहे. मुसळधार पावसामुळे 'सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड' मधील कोळसा उत्खननात आलेली घट आणि प्राप्तिकराच्या टप्प्यांमध्ये झालेले बदल, ही यामागील मुख्य कारणे असल्याचे सांगण्यात आले.

MS Dhoni
IPL 2026 Playoff Scenario: सलग दोन पराभव; गतविजेती RCB ढेपाळली... CSK च्या मनात 'लड्डू फुटे', Playoff मध्ये 'कांड' होणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news