Credit Cards Offers: सिनेमा पाहण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार नाहीत; 'या' Credit Cards वर मिळतेय फ्री तिकिट

Credit Cards Offers: HDFC, Axis, SBI आणि ICICI या बँकांचे खास क्रेडिट कार्ड्स सिनेमा तिकिटांवर फ्री ऑफर्स आणि आकर्षक सवलती देत आहेत. योग्य कार्ड निवडून तुम्ही दर महिन्याला शेकडो रुपयांची बचत करू शकता.
Credit Cards Offers
Credit Cards OffersPudhari
Published on
Updated on

Credit Cards Offer Movie Ticket Discounts: जर तुम्हाला दर आठवड्याला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याची सवय असेल, तर आता त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. काही खास क्रेडिट कार्ड्स आता सिनेमा तिकिटांवर ऑफर्स देत आहेत. चला पाहूया अशी कोणती कार्ड्स आहेत जी तुमच्या खिशावरचा ताण कमी करणार आहेत.

HDFC Times Card – सिनेमाप्रेमींसाठी खास पर्याय

BookMyShow वरून तिकीट बुक करताना या कार्डवर तुम्हाला प्रत्येक तिकिटावर ₹150 पर्यंत सूट मिळते. एका ट्रान्झॅक्शनवर ₹350 पर्यंत फायदा होऊ शकतो आणि महिन्याला चार तिकिटांवर ही सूट लागू होते. त्यासोबत टाइम्स प्राइम मेंबरशिप आणि इतर लाइफस्टाइल ऑफर्सही मिळतात. म्हणजे सिनेमा सोबत अनेक अतिरिक्त सुविधाही मिळतात.

Axis My Zone Credit Card – Paytm वापरणाऱ्यांसाठी परफेक्ट कार्ड

जर तुम्ही Paytm वरून तिकीट बुक करता, तर हे कार्ड तुमच्यासाठी फायद्याच आहे. दर महिन्याला एक फ्री मूव्ही तिकीट (₹200 पर्यंत) मिळतं. याशिवाय Zomato, Spotify आणि Myntra सारख्या प्लॅटफॉर्मवरही एक्स्ट्रा डिस्काउंट मिळतं. हे कार्ड विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहे, जे मित्रमैत्रिणींसोबत मूव्ही नाइट्स प्लॅन करतात.

Credit Cards Offers
PF Withdrawal Marathi | नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफचे पैसे काढण्याची 'ही' आहे सर्वात सोपी आणि जलद पद्धत

SBI Card ELITE – Buy 1 Get 1 Free चा धमाका

BookMyShow वरून तिकिटं बुक करणाऱ्यांसाठी SBI Card ELITE हा एक उत्तम पर्याय आहे. या कार्डवर “Buy 1 Get 1 Free” ऑफर मिळते, प्रति तिकीट ₹250 पर्यंत सूट मिळते. ही ऑफर महिन्यातून दोन वेळा लागू होते, म्हणजे वर्षभरात जवळपास ₹6,000 ची बचत होऊ शकते.

ICICI Coral Credit Card – अधूनमधून सिनेमा पाहणाऱ्यांसाठी फायद्याचं

जर तुम्ही महिन्यातून एक-दोन वेळा सिनेमा पाहायला जात असाल, तर हे कार्ड तुमच्यासाठी उत्तम आहे. BookMyShow वर महिन्यातून दोन वेळा 25% पर्यंत सूट मिळते. प्रत्येक तिकिटावर ₹100 पर्यंत डिस्काउंट मिळतो. शिवाय निवडक रेस्टॉरंट्समध्ये विशेष डाइनिंग ऑफर्सही मिळतात.

Credit Cards Offers
New Rules November 1 | तुमचे बजेट बिघडणार? आजपासून लागू झालेले 5 मोठे आर्थिक बदल जाणून घ्या!

आता सिनेमा पाहणं म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर स्मार्ट बचतीचं साधनही आहे. या क्रेडिट कार्ड्सपैकी कोणतंही निवडलंत, तरी दर महिन्याला तिकिटांवर चांगली बचत करता येईल. फक्त ऑफर्सच्या Terms & Conditions नीट वाचा आणि मग निर्णय घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news