Petrol Diesel Prices | इस्रायल- इराणमध्ये संघर्ष वाढल्याने कच्चे तेल भडकले; पेट्रोल- डिझेल दरावर काय परिणाम?

मध्य पूर्वेतून तेल निर्यातीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे
Petrol Diesel Prices
कच्च्या तेलाच्या दरात वाढ.(Pudhari Photo)
Published on
Updated on

Petrol Diesel Prices

इस्रायल-इराणमध्ये संघर्ष वाढला आहे. यामुळे मध्य पूर्वेतून तेल निर्यातीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी कच्च्या तेलाचे (crude oil prices) दर भडकले आहेत. शुक्रवारी ब्रेंट क्रूड फ्युचर्सचा दर ४.८७ डॉलरने म्हणजेच ७ टक्के वाढून प्रति बॅरल ७४.२३ डॉलरवर स्थिरावला. काल सुरुवातीला तो सुमारे १३ टक्के वाढून ७८.५० डॉलरवर गेला होता. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूडचा दर ४.९४ डॉलर अथवा ७.२६ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७२.९८ डॉलरवर बंद झाला.

इस्रायलने म्हटले आहे की त्यांनी इराणचे अण्वस्त्र तळ, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखाने आणि प्रमुख लष्करी कमांडरना लक्ष्य केले. त्यानंतर काही वेळातच, इराणने तेल अवीवमधील इमारतींवर क्षेपणास्त्र हल्ला केला. तसेच दक्षिण इस्रायलमध्येही स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

Petrol Diesel Prices
Israel-Iran conflict : "इस्‍त्रायलला पूर्णपणे नष्ट करू" : इराणचे सर्वोच्च नेते खामेनींची धमकी

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणच्या नॅशनल ऑईल रिफायनरी आणि डिस्ट्रिब्युशन कंपनीने म्हटले आहे की, तेल शुद्धीकरण आणि तेलसाठे ठिकाणे अबाधित आणि पूर्णपणे कार्यरत आहेत.

पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त

तेल निर्यातदार देशाची संघटना अर्थात ओपेक (OPEC) चा सदस्य असलेला इराण दररोज सुमारे ३३ लाख बॅरल तेलाचे उत्पादन घेतो. तर इराणमधून सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल आणि इंधन निर्यात केले जाते. ओपेक आणि रशियासह त्याच्या सहयोगी देशांची तेल उत्पादन क्षमता इराणच्या उत्पादनाएवढीच आहे. यामुळे जर इराणमधून तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास ही तूट भरून निघू शकते.

Petrol Diesel Prices
Donald Trump on Iran | इराणला 60 दिवसांची मुदत दिली होती; त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला...

पेट्रोल- डिझेल महागणार का?

भारतात तेलाच्या गरजेच्या सुमारे ८० टक्के तेल आयात केले जाते. पण मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे तेल वाहतुकीत संभाव्य व्यत्यय येण्याची चिंता वाढली आहे. इराणला अरबी समुद्र आणि हिंदी महासागराशी जोडणारा हा एकमेव दुवा मानला जातो. ही भारतासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. कारण यामुळे पेट्रोल- डिझेलचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की येत्या काही महिन्यांत पुरेल इतका देशात पेट्रोल, डिझेल, जेट इंधन आणि एलपीजी सारख्या पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news