

Israel-Iran conflict : इस्रायलने इराणवर हल्ला करुन मोठी चूक केली आहे. या चुकीचे परिणाम भयानक असतील. इराणचे लष्कर इस्रायलचा सामना करण्यास पूर्णपणे तयार आहे. देवाच्या कृपेने, इस्त्रायला पूर्णपणे नष्ट करु, अशी धमकी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर दिली. या धमकीमुळे आता पुन्हा एकदा मध्य पूर्वेत युद्धाचे ढग दाटून आले आहेत.
खामेनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, इराणचे सर्व अधिकारी सैन्यासोबत आहेत. आम्ही निश्चितपणे आमच्या शहीद जवानांचा बदला घेऊ. आम्ही आमच्या हवाई क्षेत्राच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करणार नाही. आमचे सैन्य पूर्णपणे तयार आहे. देशातील सर्व अधिकारी आणि लोक आमच्या सशस्त्र दलांच्या मागे उभे आहेत."
झायोनिस्ट राजवटीने गंभीर चूक केली आहे. आम्हाला दहशतवादी झिओनिस्ट राजवटीला कठोर उत्तर द्यावे लागेल. आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ. या गुन्ह्यानंतर त्यांना कोणतीही दया दाखवणार नाही. झिओनिस्ट राजवट सुरक्षित राहणार नाही. इराणी जनता आमच्यासोबत आहे. सर्वजण आमच्या सैन्याला पाठिंबा देतात. इस्लामिक रिपब्लिक झिओनिस्ट राजवटीवर मात करेल. आपण दुष्ट, घृणास्पद, दहशतवादी झिओनिस्ट ओळखीला कडक प्रत्युत्तर दिले पाहिजे. . आम्ही शत्रूवर कठोर प्रहार करु. देवाच्या कृपेने, इस्त्रायला पूर्णपणे नष्ट करु, इराणी जनता आपल्यासोबत आहे. ते सशस्त्र दलांना पाठिंबा देतील. इस्लामिक रिपब्लिक देवाच्या इच्छेने झिओनिस्ट राजवटीवर विजय मिळवेल. यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहोट इस्त्रालयने इराणवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि प्रमुख अणुशास्त्रज्ञ ठार झाले आहेत. इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ऑपरेशन रायझिंग लायन सुरु केले आहे. या कारवाई अंतर्गत तेहरानमधील लष्करी तळ आण इराणच्या आण्विक केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात इराणच्या एलिट रिव्होल्यूशनरी गार्डर्स कॉर्प्सचे प्रमुख कमांडर जनरल हुसेन सलामी हे तेहरानमधील आयआरजीसी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात ठार झाले आहेत. इारणी सशस्त्र दलांचे प्रमुख आणि देशातील दुसर्या क्रमांकाचे अधिकारी मेजर जनरल मोहम्मद बघेरी यांचाही या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे.