OpenAI Trouble: OpenAIचा रिअल टाइममध्ये उपयोग नाही; गुंतवणूकदार जॉर्ज नोबलचा गंभीर इशारा, कंपनी संकटात?

OpenAI Trouble Signs: गुंतवणूकदार जॉर्ज नोबल यांनी OpenAIबद्दल “कंपनी रिअल टाइममध्ये ढासळतेय” असा गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार Geminiची स्पर्धा वाढली आहे, खर्च प्रचंड आहे आणि कंपनीतील मोठे अधिकारी बाहेर पडत आहेत.
OpenAI Trouble Signs
OpenAI Trouble SignsPudhari
Published on
Updated on

George Noble Questions OpenAI’s Sustainability: सध्या जगभरात AIची जोरदार चर्चा सुरु असताना, OpenAIबाबत एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार जॉर्ज नोबल यांनी OpenAIवर थेट टीका करत, “कंपनी रिअल टाइममध्ये ढासळतेय, कंपनीचा रिअल टाइममध्ये उपयोग नाही” असा गंभीर इशारा दिला आहे. OpenAI कंपनीचे व्हॅल्युएशन 500 बिलियन डॉलर असले, तरी आतून परिस्थिती बिघडत असल्याची चिन्हं दिसत असल्याचा दावा नोबल यांनी X (ट्विटर)वर केला आहे.

नोबल यांच्या म्हणण्यानुसार डिसेंबर महिन्यात OpenAIमध्ये 'Code Red' अशी परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे कंपनी संकटात असल्याची भावना निर्माण झाली होती. त्यांचा दावा आहे की, सॅम अल्टमन यांनी कर्मचार्‍यांना 'सगळं बाजूला ठेवा आणि काम करा' असं सांगितलं. कारण Google Gemini वेगाने पुढे जात आहे आणि ChatGPTचा वापर कमी होत आहे. नोबल यांनी म्हटलंय की ChatGPTचे ट्रॅफिक सलग दोन महिन्यांपासून घसरतेय, तर Geminiचे युजर्स 65 कोटीपर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे.

एका तिमाहीत 12 अब्ज डॉलर खर्च

नोबल यांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे OpenAIचा खर्च आणि तोटा. त्यांनी दावा केला की Microsoftच्या माहितीनुसार OpenAIने एका तिमाहीत तब्बल 12 अब्ज डॉलर खर्च केले आहेत. याशिवाय त्यांनी असेही म्हटलं की, एका अंदाजानुसार कंपनीला नफ्यात येण्यासाठी आधी खूप मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

‘Sora’ टूलचा खर्च वाढला

OpenAIच्या व्हिडिओ जनरेशन टूल Sora बाबतही नोबल यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या दाव्यानुसार Sora चालवण्यासाठी रोजचा खर्च 15 मिलियन डॉलर इतका आहे. इतकंच नाही तर कंपनीतील एका वरिष्ठ इंजिनिअरनेही “हा खर्च सध्याच्या परिस्थितीत खूप जास्त आहे,” अशा अर्थाचं मत व्यक्त केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

OpenAI Trouble Signs
Emotion Recognizing AI Pet | तुमच्या भावना ओळखणारा एआय पेट

मोठ्या लोकांची एक्झिट

नोबल यांच्या मते, OpenAIमध्ये अजून एक गंभीर गोष्ट घडतेय ती म्हणजे टॉप लेव्हलवरील लोक बाहेर पडत आहेत. त्यांनी काही मोठ्या नावांचा उल्लेख केला आहे यात CTO मीरा मुराटी, चीफ सायंटिस्ट इलिया सुत्सकेवर तसेच AI सेफ्टी टीममधील अनेक लोक बाहेर पडत आहेत. या सगळ्यांमुळे कंपनीची ताकद कमी होऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.

GPT-5वर नाराजी; GPT-4 परत येणार

नोबल यांनी आणखी एक मुद्दा मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार GPT-5 युजर्सच्या अपेक्षा पूर्ण करत नाही, म्हणून काही युजर्सनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे OpenAIला काही तासांतच जुन्या मॉडेलची मदत घ्यावी लागल्याचा दावा त्यांनी केला आहे.

OpenAI Trouble Signs
AI car technology: एआयच्या आदेशावर धावणारी कार! स्कोडाची नवी ‘कुशाक’ प्रवासाचा अनुभव करणार दुप्पट

AIचं वास्तव वेगळचं आहे

नोबल यांच्या मते, AI क्षेत्रात सध्या प्रचंड वाढ होत आहे, पण प्रत्यक्षात खर्च वाढतोय, स्पर्धा वाढतेय आणि अनेक गोष्टी कंट्रोलच्या बाहेर जात आहेत. त्यांचा अंदाज असा की, OpenAIला पुढील काही वर्षांत महसूल मोठ्या प्रमाणात वाढवावा लागेल. नाहीतर कंपनीला मोठा धक्का बसू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news