

Income Tax Return 2026: जर तुमच्या पगारातून एक रूपया देखील टीडीएस कट होत नसेल तर तुमच्यावर लागणारा टॅक्स हा शून्य असेल अशा भ्रमात राहू नका. आयटीआर भरताना एफडीचे व्याज, सेव्हिंग अकाऊंटचे व्याज, इतर कमाई देखील टॅक्स अमाऊंटमध्ये पकडली जाते. २०२५ च्या बजेटमध्ये सरकारने नवीन टॅक्स रिजीमअंतर्गत सेक्शन 87A ची टॅक्स सूट ही १२ लाखापर्यंत वाढवली आहे.
स्टँडर्ड डिक्शन ७५००० रूपये जोडले तर जवळपास १२.७५ लाख रूपयांच्या सॅलरीमधून सहसा टीडीएस कट होत नाही. मात्र इथंच सगळा गोंधळ सुरू होतो कारण अनेक लोकांचा असा ग्रह होतो की टीडीएस कट होत नाही म्हटल्यावर आपल्याला टॅक्स देखील लागणार नाही. मात्र प्रत्येक केसमध्ये असं होत नाही.
तुमच्या एम्पलॉयर तुमच्या पगाराच्या आधारावरच तुमचा टीडीएस कट असतो. त्याला तुमच्या एफडीवर किती व्याज आहे, सेव्हिंग अकाऊंटमधून किती व्याज मिळतं. भाड्यातून किती उत्पन्न मिळतं दुसरा कोणात इनकम सोर्स आहे का याची माहिती नसते.
चार्टर्ड अकाऊंटट गोविंद कुमार यांच्या म्हणण्यानुसार, 'सर्वात जास्त त्रास त्यावेळी होतो ज्यावेळी कर्मचाऱ्याचा पगार १२ लाखांपर्यंत असतो त्याचा टीडीएस कट होत नाही. मात्र आयटीआर भरतेवेळी एफडी व्याज, सेव्हिंग व्याज, दुसरे उत्पन्न यात समाविष्ट झाल्यावर टॅक्सेबल अमाऊंट वाढते
इनकम टॅक्स हा तुमच्या एकूण उत्पन्नावर आधारित असोत. तो फक्त तुमच्या पगारावर अवलंबून नसतो. त्यामुळं ज्यावेळी तुमचा एकूण इनकम हा १२ लाख रूपयांच्या पुढे जातो त्यावेळी 87A अंतर्गत मिळणारी टॅक्स सूट ही कमी होत जाते.
दुसरीकडे कॅपिटल गेन सारख्या इनकमवर वेगळे नियम लागू होतात. अशा इनकमवर वेगळ्या टॅक्स रेटनुसार टॅक्स लागतो तसेच १२ लाख रूयपांचे टॅक्स फ्री लिमिट देखील लागू होत नाही. असे असले तरी फार टॅक्स भरावा लागू नये यासाठी जरी इनकम १२ लाख रूपयांच्या थोडे पुढे गेला तरी मार्जिनल रिलीफची तरतूद सरकारने केली आहे.
उदाहरणच द्यायचं झालं तर तुमची ग्रॉस सॅलरी ही १३.१० लाख रूपये असेल तर ७५ हजार स्टँडर्ड डिक्शननंतर तुमची टॅक्सेबल इनकम हा १२.३५ लाख रूपये होईल. टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला जवळपास ६५ हजार २५० रूपये टॅक्स येईल. मात्र मार्जिनल रिलीफनंतर तुमचा टॅक्स हा ३५,००० रूपयांपेक्षा जास्त येणार नाही.