1 July new rules: १ जुलैपासून अनेक नियम बदलणार; LPG, रेल्वे, आधार ते क्रेडिट कार्ड, कोणावर होणार सर्वाधिक परिणाम?

1 जुलैपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत.
1 July new rules
1 July new rulesfile photo
Published on
Updated on

1 July new rules

मुंबई: 1 जुलैपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. एलपीजी सिलिडरच्या किमतींपासून ते रेल्वेतील दंड, आधार अपडेट, आयकर रिटर्न, क्रेडिट कार्डच्या सुविधांपर्यंत अनेक बदल लागू होणार असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर आणि आर्थिक नियोजनावर होणार आहे.

ITR भरण्याची अंतिम मुदत जवळ

आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. ज्यांचे उत्पन्न पगार, घरमालमत्ता, भांडवली नफा किंवा इतर गैर-व्यावसायिक स्रोतांमधून मिळते आणि ज्यांच्या खात्यांचे ऑडिट आवश्यक नाही, अशा करदात्यांनी ITR-1 किंवा ITR-2 फॉर्म भरावा.

TDS भरण्याची अंतिम तारीख

ज्या करदात्यांना आयकर विभागाने तिमाही आधारावर TDS जमा करण्याची परवानगी दिली आहे, त्यांच्यासाठी एप्रिल-जून तिमाहीचा TDS भरण्याची अंतिम तारीख 7 जुलै असेल.

1 July new rules
Success Story: पगार सोडून तरुणीने एका महिन्यात कमावले ६३ लाख रुपये; सांगितले उत्पन्नाचे ६ स्रोत

रेल्वेचे नियम अधिक कठोर

1 जुलैपासून भारतीय रेल्वे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार आहे. विनातिकीट प्रवास केल्यास किमान दंड 250 रुपयांवरून 500 रुपये केला जाणार. महिलांसाठी राखीव डब्यात प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांना 2,500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास केल्यास अधिक दंड भरावा लागू शकतो. जनरल तिकीट घेऊन स्लीपर डब्यात प्रवास करणाऱ्यांवरही कडक कारवाई होणार.

परवानगीशिवाय वस्तू विक्री, रेल्वेत भीक मागणे, मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे, गैरवर्तन, रेल्वे परिसरात अनधिकृत प्रवेश किंवा धोकादायक वस्तू चुकीच्या पद्धतीने वाहून नेणे यावरही अधिक दंड आकारला जाणार आहे.

आधार अपडेट मोफत

1 जुलै ते डिसेंबर या कालावधीत आधार कार्डमधील काही माहिती मोफत अपडेट करता येणार आहे. यामध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, या माहितीचा समावेश आहे. यापूर्वी या अपडेटसाठी 75 रुपये शुल्क आकारले जात होते.

LPG सिलेंडरच्या किमती बदलण्याची शक्यता

दर महिन्याप्रमाणे 1 जुलैला सरकारी तेल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आणि सरकारी धोरणानुसार सिलिंडरचे दर वाढू किंवा कमी होऊ शकतात.

CNG, PNG आणि ATFचे दरही बदलू शकतात

1 जुलैपासून CNG, PNG आणि विमान इंधन (ATF) यांच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम घरगुती खर्चासोबतच हवाई प्रवासावरही होऊ शकतो.

HDFC Bank क्रेडिट कार्डचे नवे नियम

HDFC Bank Regalia Gold क्रेडिट कार्डधारकांना आता देशांतर्गत विमानतळावरील मोफत लाउंज सुविधा मिळवण्यासाठी नवी अट पूर्ण करावी लागेल. पुढील तिमाहीत मोफत लाउंज सुविधा मिळवण्यासाठी मागील तिमाहीत किमान 60 हजार रुपयांचा खर्च करणे आवश्यक असेल.

Citi Credit Card चे Axis Bank मध्ये हस्तांतरण

15 जुलैपर्यंत सर्व Citi Credit Card पूर्णपणे Axis Bank मध्ये हस्तांतरित केले जाणार आहेत. मात्र, कार्ड क्रमांक, PIN, एक्सपायरी तारीख, यामध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच बिलिंग सायकल, पेमेंटची अंतिम तारीख आणि स्टेटमेंट जारी होण्याची तारीखही पूर्वीप्रमाणेच राहील. तथापि, रिवॉर्ड पॉइंट्स आता Axis Bank च्या प्लॅटफॉर्मवर दिसतील आणि व्याजदरही बँकेच्या नव्या नियमांनुसार लागू होतील.

YES Bank क्रेडिट कार्डधारकांसाठी नवे निकष

1 जुलैपासून YES Bank च्या अनेक क्रेडिट कार्डधारकांना देशांतर्गत विमानतळ लाउंजची मोफत सुविधा मिळवण्यासाठी प्रत्येक तिमाहीत किमान 35 हजार रुपयांचा खर्च करावा लागेल. यापूर्वी ही मर्यादा 10 हजार रुपये होती. हा नियम YES Marquee, YES Select, YES Reserv, YES First Preferred आणि YES Elite यांसह अनेक कार्डांवर लागू होणार आहे.

1 July new rules
ITR Filing 2026: ITR भरण्याची शेवटची तारीख कोणती? उशीर झाला तर भरावा लागणार 5 हजारांचा दंड; जाणून घ्या संपूर्ण माहिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news