Highest Average Monthly Salary: भारतात सर्वाधिक 'सरासरी पगार' देणारे राज्य कोणते... महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो?

Highest Average Monthly Salary
Highest Average Monthly Salarypudhari
Published on
Updated on

Highest Average Monthly Salary: भारतात कोणतं राज्य प्रगत याबाबत सतत चर्चा होत असते. कोणत्या राज्यात किती बिजनेस आले, परदेशी गुंतवणूक खेचून आणण्यात कोण आघाडीवर याची स्पर्धा लागलेली असते. नुकतेच भारतातील कोणत्या राज्यात सरासरी किती पगार आहे याची आकडेवारी देखील एका अभ्यासानंतर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Highest Average Monthly Salary
Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला, निफ्टी 23,700 च्या पार; IT शेअर्स पुन्हा चमकले

कुठे असतात चांगले पगार?

भारतातील पगार हे राज्य, तेथील उद्योग, नोकऱ्यांची संधी आणि नागरीकरणाचा स्तर याच्यावर अवलंबून असते. भारताच्या बाबतीत विचार करायचा झाला तर ज्या राज्यात आयटी उद्योग, व्यापार, मॅन्युफॅक्चरिंग यांची चांगली इकोसिस्टम असते तिथे सहसा सरासरी पगार हे चांगले असतात. मात्र देशातील अनेक विकसनशील राज्यांमध्ये सरासरी पगार अत्यंत कमी आहेत.

मात्र असं असलं तरी जास्त सरासरी पगार म्हणजे उच्च रहाणीमान असा निष्कर्ष काढता येत नाही. कारण ज्या शहरात जास्त पगार असतात तिथं लिव्हिंग कॉस्ट, भाडे आणि इतर खर्च देखील जास्त असतात.

Highest Average Monthly Salary
Viral News: ना पगार, ना अनुभव... नोकरी नाकारण्याचं अजब कारण; कंपनीचं 'हे' लॉजिक ऐकून तुमच डोकं फिरल! रिजेक्शन लेटर व्हायरल

कोणते राज्य आहे अव्वल?

upsurge ने दिलेल्या माहितीनुसार भारतात सर्वाधिक सरासरी पगार हा राजधानी दिल्लीत मिळतो. दिल्लीत सरासरी पगार हा ३५ हजार असून त्या खालोखाल कर्नाटक राज्याचा नंबर लागतो. आपल्या आयटी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्नाटक राज्यात मिळणारा सरासरी पगार हा ३३ हजार रूपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर उद्योग धंदे आणि व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात सरासरी पगार हा ३२ हजार रूपये आहे. कर्नाटकात बंगळुरू हे महत्वाची मेट्रोसिटी आहे. तर महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई ही दोन प्रमुख शहरे आहेत.

Highest Average Monthly Salary
Thane teachers salary issue: अतिरिक्त ठरलेले शिक्षक पगारापासून वंचित; आमदार संजय केळकर यांची उप संचालकांशी चर्चा

ही राज्ये आहेत पिछाडीवर

भारतात सर्वात कमी सरासरी पगार हा लडाख राज्यात मिळतो. तिथं सरासरी पगार हा १२,५०० रूपये असून त्या खालोखाल बिहारचा नंबर लागतो. बिहारमध्ये सरासरी १३,५०० रूपये पगार मिळतो. मिझोरम आणि नागालँडमध्ये सरासरी पराग हा प्रत्येकी १४ हजार रूपये आहे.

वरील सर्व आकडेवारी ही upsurge ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील आकडेवारी ही वेगवेगळ्या सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या डेटाबेस आणि इस्टिमेटमरून मिळवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news