Gold Silver Price: लग्नसराईत ग्राहकांना दिलासा; सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, काय आहे आजचा भाव?

Gold Silver Price Today India: लग्नसराईच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. चांदी तब्बल 2,700 रुपयांनी घसरली, तर सोन्याच्या दरातही घट झाली.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on
Updated on

Gold Silver Price Today India: लग्नसराईच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज गुरुवारी, 9 एप्रिल रोजी देशांतर्गत बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंचे दर खाली आलेले दिसले. सकाळच्या सत्रातच किंमतींमध्ये घसरण सुरू झाली आणि व्यवहारादरम्यान ती कायम राहिली.

Multi Commodity Exchange (MCX) वर 5 जून 2026 एक्सपायरी असलेला गोल्ड फ्युचर्स सुमारे 420 रुपयांनी घसरला. सोन्याने 1,50,647 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने ओपनिंग केली होती. मागील सत्रात सोनं 1,51,776 रुपयांवर बंद झालं होतं. सकाळी सुमारे 9:50 वाजता सोन्याचा दर 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह 1,51,357 रुपयांवर ट्रेड करत होता. व्यवहारादरम्यान सोन्याने 1,51,452 रुपयांचा उच्चांकही गाठला होता.

चांदीच्या किंमतीत तर मोठी घसरण दिसून आली. MCX वर 5 मे 2026 एक्सपायरी असलेली चांदी सुमारे 2,710 रुपयांनी घसरली, म्हणजेच 1.13 टक्क्यांची घसरण झाली. चांदीने दिवसाची सुरुवात 2,35,850 रुपयांवर केली होती, तर दिवसातील उच्चांक 2,37,589 रुपये होता.

Gold Silver Price Today
RBI MPC Meeting: इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर RBI चा मोठा निर्णय; तुमचा EMI कमी झाला का?

स्पॉट मार्केटमध्येही चांदीचे दर कमी झाले आहेत. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे 10 ग्रॅम चांदीचा दर सुमारे 2,601 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीसाठी ग्राहकांना सुमारे 26,010 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीचा दर थोडा जास्त म्हणजे 2,651 रुपये आहे.

सोन्याच्या किंमती शहरानुसार थोड्या बदलत आहेत. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेटसाठी 1,41,160 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,15,530 रुपये दर आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोने 1,53,830 रुपयांवर आहे, तर 22 कॅरेट 1,41,010 रुपये आणि 18 कॅरेट 1,15,380 रुपये दराने विकले जात आहे. पुण्यातही जवळपास हेच दर कायम आहेत.

Gold Silver Price Today
LPG Booking Update: LPG बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारचा ग्राहकांना इशारा, फक्त ओळखपत्रावर मिळणार...

एकूणच, लग्नाच्या हंगामाआधी सोन्या-चांदीच्या किंमतीत झालेली ही घसरण ग्राहकांसाठी खरेदीची संधी ठरू शकते. मात्र, जागतिक घडामोडी, डॉलरचा दर आणि कच्च्या तेलातील चढ-उतार यावर पुढील किंमती अवलंबून असणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news