Gold Silver Rates Fall: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण तरी सोने चांदीचे दर का कोसळले?

Gold-Silver Rate Today
Gold-Silver Rate TodayPudhari
Published on
Updated on

Gold Silver Rates Fall: मध्य पूर्व आशियात युद्ध सुरू असलेल्यामुळं जगभरातील शेअर बाजार धडाम होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आधीच तेजीत असलेली सोने चंदी अजून वधारण्याची शक्यता आहे. मात्र आज सोने चांदीच्या दरात वाढ होण्याऐवजी ते कोसळले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार क्रॅश झाला होता. तर सोने चांदीच्या दरात देखील घसरण झाली.

Gold-Silver Rate Today
Iran US Conflict North Korea: आता उत्तर कोरियाची फ्रंट देखील होणार ओपन...? अमेरिकेनं दक्षिण कोरियासोबत सुरू केली 'फ्रीडम शील्ड'

अनिश्चिततेचे वातावरण असताना सोने चांदी ही उत्तम गुंतवणुकीचा पर्याय ठरतात. मात्र आता त्याचेच दर पडल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोमवारी चांदीचे दर ७ हजार ५०० रूपयांनी म्हणजे जवळपास २.५३ टक्क्यांनी कोसळले तर सोन्याचे दर हे प्रती १० ग्रॅम १८०० रूपयांनी घसरले आहेत.

Gold-Silver Rate Today
Mohammad Amir India Win: वर्ल्डकप घेऊन माझ्या घरी थोडेच येणार आहेत... भारत हरणार म्हणणाऱ्या पाक क्रिकेटपटूचे 'गिरे तो भी टांग उपर'

चांदीमध्ये पुन्हा मोठी घसरण

चांदीच्या दराबाबत बोलायचं झालं तर मल्टी कमोडिटी एक्सचेंजचे ५ मे एक्सपायरी असलेल्या चांदीचा वायदा बाजार भाव शुक्रवारी २ लाख ६८ हजार २८५ रूपये प्रतीकिलो पर्यंत होता. मात्र दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज सोमवारी बाजार उघडताच चांदीचे दर २ लाख ६० हजार ७४३ रूपयांपर्यंत खाली आली. चांदी एका झटक्यात प्रती किलो ७ हजार ५४३ रूपयांनी स्वस्थ झाली. २९ जानेवारी रोजी चांदी आपल्या सर्वोच्च ४ लाख २० हजार ४८ रूपयाला पोहचली होती. तेव्हापासून चांदीमध्ये जवळपास १ लाख ५९ हजार ३०५ रूपयांची घट झाली आहे.

Gold-Silver Rate Today
Gold purchase tips | सोने खरेदी करताना 90% लोक करतात 'या' 5 मोठ्या चुका

सोन्याचे भाव देखील कोसळले

चांदीपाठोपाठ सोन्याचे भाव देखील घसरले. MCX Gold Rate पाहिले तर २ एप्रिलच्या एक्सपायरीचे सोने गेल्या शुक्रवारी प्रती १० ग्रॅम १ लाख ६१ हजार ६३४ रूपयांना होती. सोमवारी हाच दर बाजार उघडताच १ लाख ५९ हजार ८२९ रूपये इतका खाली आला आहे. म्हणजे १० ग्रॅम सोन्याचा दर १८०८ रूपयांनी कमी आला आहे. २९ जानेवारी रोजी सोनं प्रती १० ग्रॅम १ लाख ९३ हजार ९६ रूपये इतक्या ऑल टाईम हायला पोहचलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या दरात ३३ हजार २७० रूपयांची घट झाली आहे.

Gold-Silver Rate Today
1000 year old gold coin | इंग्लंडमध्ये सापडले एक हजार वर्षांपूर्वीचे सोन्याचे नाणे

का कोसळत आहेत सोन्या चांदीचे दर?

सहसा जगभरात युद्धाचे ढग किंवा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्यानंतर सोने चांदीतील गुंतवणूक वाढते. ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळं सोने चांदीचे दर वाढतात असा ट्रेंड असतो. मात्र जग तिसऱ्या महायुद्धाच्या अगदी जवळ आलेले असतानाही सोने चांदीच्या दरात घट झाली आहे.

जाणकारांच्या मते युद्धापूर्वी सोने चांदीच्या दरात मोठी उसळी आली होती. युद्ध सुरू झालं त्यावेळी देखील यात तेजी होती. मात्र आता गुंतवणूकदार नफा मिळवण्यासाठी आणि आपल्याकडे अधिक कॅश ठेवण्याला जास्त महत्व देत आहेत. त्यामुळं सोने चांदीचे दर कोसळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news