Gold Silver Price Today: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! रक्षाबंधनालाच दर घसरले; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today: रक्षाबंधनाच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on
Updated on

Gold Silver Price Today: रक्षाबंधनाच्या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज, 28 ऑगस्ट रोजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे बहिणीला सोन्याची अंगठी, पेंडंट किंवा चांदीचे दागिने भेट देण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस खरेदीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

भारतात आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा सरासरी दर 16,297 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 10 ग्रॅमसाठी 1,62,970 रुपये इतका आहे. तर दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक पसंतीच्या 22 कॅरेट सोन्याचा दर 14,939 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 10 ग्रॅमसाठी 1,49,390 रुपये दर आहे.

दिल्ली-मुंबईत सोन्याचा आजचा दर किती?

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर जवळपास समान पातळीवर आहेत. दिल्ली आणि मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 1,63,130 रुपये असून, 22 कॅरेट सोन्याचा दर 1,49,540 रुपये इतका आहे.

सोन्याच्या वायदे बाजारातही घसरण

पीटीआयच्या वृत्तानुसार, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या कराराचा भाव 13 रुपये किंवा 0.01 टक्क्यांनी घसरून 1,59,650 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

सत्राच्या सुरुवातीला सोन्याच्या वायदा भावात मोठी घसरण झाली होती. मागील बंद भाव 1,59,663 रुपयांवरून सोने 2,971 रुपयांनी घसरून 1,56,692 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या नीचांकी स्तरावर पोहोचले होते.

दरम्यान, जागतिक बाजारात मात्र न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या किमतीत तेजी दिसून आली असून, सोने 0.23 टक्क्यांनी वाढून 4,601.64 डॉलर प्रति औंस या स्तरावर पोहोचले आहे.

Gold Silver Price Today
Supriya Sule: ‘आजही वाटतं, तू अचानक येशील...’; राखीपौर्णिमेला सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, दादाच्या आठवणींनी डोळे पाणावले

रक्षाबंधनाला चांदीही झाली स्वस्त

रक्षाबंधनाच्या दिवशी चांदीच्या दरातही किंचित घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात आज चांदीचा सरासरी भाव 2.60 लाख ते 2.65 लाख रुपये प्रति किलो या दरम्यान आहे.

आज 1 ग्रॅम चांदीची किंमत 259.90 रुपये इतकी आहे, तर काल हा दर 260 रुपये होता. म्हणजेच चांदीच्या दरात किरकोळ घट झाली आहे.

आजचे चांदीचे दर

  • 1 ग्रॅम चांदी: ₹259.90

  • 10 ग्रॅम चांदी: ₹2,599

  • 100 ग्रॅम चांदी: ₹25,990

  • 1 किलो चांदी: ₹2,59,900

Gold Silver Price Today
LPG Connection New Rules: घरात LPG सिलिंडर आहे? मग सावधान! सरकारच्या नव्या प्लॅनमुळे बदलू शकतात गॅस कनेक्शनचे नियम

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला मौल्यवान भेटवस्तू देण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सोन्या-चांदीच्या किमतीतील ही घसरण दिलासादायक ठरू शकते. मात्र, सराफा बाजारातील दर शहरानुसार तसेच मेकिंग चार्ज, जीएसटी आणि इतर शुल्कांमुळे बदलू शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक ज्वेलर्सकडून आजचा दर तपासा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news