Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे भाव अचानक धडाम! सोनं ₹2,100 तर चांदी तब्बल ₹5,000 ने स्वस्त; जाणून घ्या आजचे भाव

Gold Silver Price Today: 3 सप्टेंबर रोजी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सोने 2,100 रुपये आणि चांदी 5,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on
Updated on

Gold Silver Price Today: महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खर्चाचा ताण वाढत असताना सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 3 सप्टेंबर रोजी देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या किमतीत तब्बल 2,100 रुपयांची घट झाली असून चांदीही 5,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सोन्याचा दर किती घसरला?

जागतिक बाजारातील हालचालींचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला आहे. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 2,100 रुपयांनी घसरून 1,56,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

याआधी सोन्याचा दर 1,58,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यातून आज थेट 2,100 रुपयांची घसरण झाली. विशेष म्हणजे, सोन्याच्या दरातील ही सलग सहाव्या सत्रातील घसरण आहे.

गेल्या सहा व्यवहार सत्रांचा विचार केला तर सोन्याच्या किमतीत तब्बल 11,000 रुपयांची घट झाली आहे. 25 ऑगस्ट रोजी सोन्याचा दर 1,67,100 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता तो 1,56,100 रुपयांवर आला आहे.

जवळपास तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर सोने

आजचा सोन्याचा दर जवळपास तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वी 14 ऑगस्ट रोजी सोने 1,56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर होते. त्यानंतर आता पुन्हा सोन्याच्या दराने या पातळीच्या आसपास व्यवहार केला आहे.

मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे चित्र देशांतर्गत बाजारापेक्षा काहीसे वेगळे आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. चांदीचा भाव तब्बल 5,000 रुपयांनी घसरून 2,35,500 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.

मागील व्यवहार सत्रात चांदीचा दर 2,40,500 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. म्हणजेच अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Gold Silver Price Today
Vidyanand Bapat: 'आमच्या भावना दुखावल्या', बापटांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार म्हणणारे धनंजय कुलकर्णी कोण? वाद पेटला

आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती?

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात मात्र वाढ दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 25.24 डॉलर म्हणजेच 0.58 टक्क्यांनी वाढून 4,303.12 डॉलर प्रति औंस झाले.

दुसरीकडे, चांदीच्या दरात जवळपास एक टक्क्यांची घसरण झाली असून ती 63.64 डॉलर प्रति औंस या पातळीवर आली आहे.

MCX वरही चांदी स्वस्त

देशांतर्गत वायदे बाजार अर्थात मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही चांदीच्या दरात घसरण दिसून आली. MCX वर चांदीचा भाव 1,841 रुपयांनी म्हणजेच जवळपास 1 टक्क्यांनी घसरून 2,33,600 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. त्यामुळे सराफा बाजार आणि कमोडिटी मार्केटमध्ये चांदीच्या दरावर सध्या दबाव असल्याचे दिसत आहे.

Gold Silver Price Today
PM Modi on Gold Purchase: '...तर सोनं खरेदी करू नका', PM मोदींचं देशवासीयांना आवाहन; नेमकं काय सांगितलं?

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची घडामोड

गेल्या काही दिवसांतील सोन्याच्या घसरणीकडे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे विशेष लक्ष आहे. अवघ्या सहा व्यवहार सत्रांत सोन्याच्या दरात 11 हजार रुपयांची घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news