Gold Silver Price Crash: सोन्या चांदीच्या बाजारात मोठी खळबळ! सोनं 4 हजारांनी तर चांदी 9 हजारांनी स्वस्त; खरेदीची सुवर्णसंधी

Gold Silver Price Crash: जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे.
Gold Silver Price Crash
Gold Silver Price CrashPudhari
Published on
Updated on

Gold Silver Price Crash: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत असून, जळगावच्या सराफ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 4 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो 9 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोन्याचा दर 1 लाख 55 हजारांवर

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात आज प्रति तोळा 4 हजार रुपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचा सध्याचा दर 1 लाख 55 हजार रुपये प्रति तोळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दरवाढीनंतर आता सलग घसरण सुरू झाल्याने बाजारातील हालचालींकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

चांदीही 9 हजार रुपयांनी स्वस्त

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 9 हजार रुपयांची घट झाली असून, आजचा दर 2 लाख 38 हजार रुपये प्रति किलो इतका आहे. अल्पावधीत झालेल्या या घसरणीमुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

Gold Silver Price Crash
Twin Baby Death Case: लग्नाच्या 24 वर्षानंतर झाल्या जुळ्या मुली; 3 महिन्यांतच दोघींचा दुर्दैवी अंत, आईने असं का केलं?

ग्राहकांसाठी खरेदीची संधी?

गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत होते. आता अचानक दर कमी झाल्याने ग्राहकांना आनंद झाला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सध्याच्या दरात घसरण झाल्याने दागिने किंवा सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही चांगली संधी ठरू शकते.

Gold Silver Price Crash
PM Modi on Gold Purchase: '...तर सोनं खरेदी करू नका', PM मोदींचं देशवासीयांना आवाहन; नेमकं काय सांगितलं?

गुंतवणूकदारांचे लक्ष दरांच्या पुढील वाटचालीकडे

दरवाढीनंतर अचानक झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीशी चिंता निर्माण झाली आहे. मात्र, ही घसरण किती काळ टिकते आणि आगामी दिवसांत सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढतात की आणखी खाली येतात, याकडे बाजारातील सर्वांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news