Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं 1,600 तर चांदी 5,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today: चांदीच्या दरातही ₹5,000 प्रति किलो घट झाली असून चांदी आता ₹2.37 लाख प्रति किलोवर पोहोचली आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on: 
Updated on: 

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात तब्बल 1,600 रुपयांची घसरण झाली. यामुळे 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 1,52,400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दरात सलग चौथ्या सत्रात घसरण झाली आहे.

बुधवारी सोन्याचा दर 1,54,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यात गुरुवारी 1,600 रुपयांची घट झाली. डॉलरमधील तेजी, अमेरिकन बॉन्डच्या परताव्यातील वाढ आणि कच्च्या तेलाच्या दरातील तेजी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यावर दबाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी चांदीचा दर 5,000 रुपयांनी कमी होऊन 2,37,000 रुपये प्रति किलो झाला. बुधवारी चांदीचा दर 2,42,000 रुपये प्रति किलोवर स्थिर होता.

गेल्या दोन दिवसांपासून चांदीच्या दरात विशेष बदल झाला नव्हता. मात्र गुरुवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने चांदीच्या किमतीवर दबाव आला. चांदीचा वापर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असल्याने जागतिक आर्थिक परिस्थितीतील बदलांचा परिणाम चांदीच्या किमतीवर तुलनेने अधिक होतो.

डॉलर मजबूत झाल्याचा सोन्याला फटका

व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत संकेत आणि उच्च पातळीवर झालेली नफावसुली हे सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमागील प्रमुख कारण आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोन्यावर दबाव वाढला आहे.

HDFC Securitiesचे वरिष्ठ विश्लेषक (जिंस) सौमिल गांधी यांच्या मते, कमकुवत जागतिक संकेत आणि किरकोळ मागणीत झालेली घट यामुळे देशांतर्गत सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. मजबूत डॉलर आणि वाढलेले बॉन्ड यिल्ड यांचा मौल्यवान धातूंवर परिणाम होत आहे.

Gold Silver Price Today
Banks Open on Sunday: 27 सप्टेंबरला रविवार असूनही बँका उघडणार; सरकारने घेतला मोठा निर्णय, काय आहे कारण?

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं-चांदी स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. स्पॉट गोल्डचा दर सुमारे 33.74 डॉलर म्हणजे जवळपास 1 टक्क्यांनी घसरून 4,253.61 डॉलर प्रति औंस झाला. त्याचवेळी चांदीचा दर 1.4 टक्क्यांनी घसरून 63.56 डॉलर प्रति औंस झाला.

कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ हीदेखील सोन्या-चांदीसाठी नकारात्मक ठरली आहे. दुसरीकडे, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 95.96 प्रति डॉलर या पातळीवर घसरल्याने भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरातील घसरण काही प्रमाणात मर्यादित राहिली.

Gold Silver Price Today
Hiring Controversy: 'या' चार राज्यातील कर्मचाऱ्यांना नोकरी देणार नाही; उद्योजकाचा मोठा निर्णय, सोशल मीडियावर संताप, काय आहे प्रकरण?

पुढे सोन्याचे दर काय राहणार?

सध्या जागतिक बाजारातील संकेत, डॉलरची हालचाल, अमेरिकन बॉन्ड यिल्ड, कच्च्या तेलाचे दर आणि देशांतर्गत मागणी या घटकांवर सोन्या-चांदीच्या किमतींची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सलग चार सत्रांतील घसरणीनंतर आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news