Gold-Silver Price Today: लग्नसराईत ग्राहकांना मोठा झटका! सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा मोठी वाढ झाली असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.59 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.
Gold-Silver Price Today
Gold-Silver Price TodayPudhari
Published on
Updated on

Gold Silver Price Today: देशात लग्नसराई असो किंवा सण-उत्सव, सोन्या-चांदीच्या खरेदीला नेहमीच महत्त्व असतं. मात्र सध्या सोन्या-चांदीच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण पडताना दिसत आहे. जर तुम्ही आज सोने किंवा चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर आधी आजचे ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आज सोन्या-चांदीचा भाव (25 मे 2026)

दिल्ली: दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 59 हजार 210 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 45 हजार 950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदीचा भाव 2 लाख 85 हजार रुपये प्रति किलो नोंदवला गेला आहे.

मुंबई: मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 59 हजार 60 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 45 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच चांदीचा दर 2 लाख 85 हजार रुपये प्रति किलो इतका आहे.

पुणे: पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 59 हजार 60 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 45 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच चांदीचा दर 2 लाख 85 हजार रुपये प्रति किलो इतका आहे.

सोन्या-चांदीचे दर एवढे का वाढत आहेत?

सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक स्तरावरील तणाव (Geopolitical Tension) आणि आर्थिक अनिश्चितता. जगात युद्धजन्य परिस्थिती, राजकीय अस्थिरता किंवा आर्थिक संकट वाढले की गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सुरक्षित पर्यायांकडे वळतात. अशा वेळी सोने आणि चांदी ‘सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट’ म्हणून पाहिले जाते. त्यामुळे या धातूंची मागणी वाढते आणि दरही वाढतात.

Gold-Silver Price Today
4 Day Work Week: आठवड्यात फक्त 4 दिवस ऑफिस? कर्मचाऱ्यांना सलग 3 दिवस सुट्टी मिळणार; फक्त ही अट पाळावी लागणार

डॉलरमध्ये घसरण, पण भारतीय ग्राहकांवर भार

अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं खरेदी करणं तुलनेने स्वस्त होतं. पण भारतासाठी परिस्थिती वेगळी आहे. कारण भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाल्याने परदेशातून सोने आयात करणे महाग झाले आहे.

याशिवाय, भारत सरकारने सोने आयातीवरील शुल्क 6 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. यामागचा उद्देश देशातून डॉलरचा बाहेर जाणारा प्रवाह नियंत्रित करणे हा आहे. मात्र याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे.

Gold-Silver Price Today
Rupee Against Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपया 150 पर्यंत घसरणार? तज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक गणित

खरेदीपूर्वी काय लक्षात ठेवाल?

तज्ज्ञांच्या मते, सोने किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी दरांची तुलना करणे, शुद्धता (कॅरेट) तपासणे आणि बाजारातील ट्रेंड समजून घेणे गरजेचे आहे. विशेषतः लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी खरेदी करत असाल, तर भावातील चढ-उतार लक्षात घेऊन निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरू शकते. एकूणच, सध्या सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या असल्या तरी जागतिक घडामोडींवर पुढील दर अवलंबून राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news