Gold Price Today: एका आठवड्यात सोने ५०६० रुपयांनी स्वस्त, तर चांदी १०००० रुपयांनी घसरली; पाहा आजचा भाव?

Gold-Silver Rate Today: इस्रायल-इराण यांच्यातील वाढता तणाव असूनही, भारतीय सराफा बाजारात या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
Gold-Silver Rate Today
Gold-Silver Rate Todayfile photo
Published on
Updated on

Gold-Silver Rate Today

दिल्ली: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि इस्रायल-इराण यांच्यातील वाढता तणाव असूनही, भारतीय सराफ बाजारात या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या सात दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम तब्बल ५,०६० रुपयांची कपात झाली आहे, तर चांदीच्या दरात १०,००० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

Gold-Silver Rate Today
Women’s Day: 'ती' ठीक आहे का? विवाहित महिलांमध्ये नैराश्य आणि चिंता का वाढते? कारणे, लक्षणे आणि उपाय

काय आहेत आजचे ताजे दर? (८ मार्च २०२६)

आज ८ मार्च रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • नवी दिल्ली: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६३,८०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

  • मुंबई/पुणे/बेंगळुरू: या शहरांमध्ये २४ कॅरेट सोने १,६३,६४० रुपये तर २२ कॅरेट सोने १,४७,६९० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिरावले आहे.

  • चेन्नई आणि कोलकाता: येथेही २२ कॅरेटसाठी १,४७,६९० रुपये आणि २४ कॅरेटसाठी १,६३,६४० रुपये असा दर सुरू आहे.

शुक्रवारी (६ मार्च) दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत १,१०० रुपयांची घट होऊन भाव १,६४,१०० रुपयांवर आला होता. व्यापाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या नफाखोरीमुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली असून, तिथे सोन्याचा भाव ५,०९५.८१ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

चांदीमध्येही मोठी पडझड

सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. एका आठवड्यात चांदी १०,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज ८ मार्च रोजी सकाळी चांदीचा भाव २,८५,००० रुपये प्रति किलो इतका आहे. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात चांदीने ४ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता, त्या तुलनेत आता मोठी सवलत मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव १.४ टक्क्यांनी वधारून ८३.४० डॉलर प्रति औंस झाला आहे.

युद्धाचा भडका आणि जागतिक परिस्थिती

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरुद्ध युद्धाची घोषणा करत हवाई हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले चढवले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, "इराणने विनाअट शरणागती पत्करल्याशिवाय कोणताही करार शक्य नाही." या जागतिक अस्थिरतेचा परिणाम आगामी काळात बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे.

Gold-Silver Rate Today
Sun Transit 2026: हातात पैसा टिकत नाही? काळजी नको! १५ मार्चला सूर्याचे राशी परिवर्तन; या ३ राशींना मिळणार अफाट संपत्ती!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news