Gold-Silver Rate: सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; अवघ्या 5 दिवसांत चांदी तब्बल 13 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव

Gold-Silver Rate: सोन्या आणि चांदीच्या किंमतींमध्ये गेल्या पाच दिवसांत मोठी घसरण झाली असून चांदी तब्बल 13,460 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.
Gold-Silver Rate
Gold-Silver RatePudhari
Published on
Updated on

Gold-Silver Rate: सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांत मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली असून विशेषतः चांदीच्या दरात लक्षणीय पडझड पाहायला मिळाली आहे. अवघ्या पाच दिवसांत चांदीचा दर तब्बल 13 हजार रुपयांहून अधिक घसरला आहे. सोनेही या घसरणीतून सुटलेले नसून त्याच्या किंमतीतही मोठी घट झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर शुक्रवारी चांदीच्या दरात जोरदार घसरण झाली. एका दिवसातच चांदीचा भाव 4,836 रुपयांनी घसरून 2,32,726 रुपये प्रति किलोवर आला. मागील आठवड्यात चांदीचा भाव 2,46,186 रुपये प्रति किलो होता. त्यानुसार केवळ पाच दिवसांत चांदी तब्बल 13,460 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.

देशांतर्गत बाजारातही चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, 12 जून रोजी 1 किलो चांदीचा दर 2,42,582 रुपये होता. तो 19 जूनपर्यंत घसरून 2,31,973 रुपयांवर आला. म्हणजेच एका आठवड्यात चांदी 10,609 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली.

Gold-Silver Rate
Most Googled Bollywood Star: गुगलवर सर्वाधिक सर्च होणारी बॉलिवूड स्टार कोण? आलिया, प्रियंका आणि दीपिकालाही टाकलं मागे

सोन्याच्या किंमतीतही गेल्या काही दिवसांत मोठी घसरण झाली आहे. MCX वर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,528 रुपयांवरून घसरून 1,47,239 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात 3,289 रुपयांची घट झाली आहे. शुक्रवारी एका दिवसातच सोन्याचा दर 2,070 रुपयांनी खाली आला.

देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. 12 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,47,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तो घसरून 1,44,970 रुपयांवर आला आहे.

सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,490 रुपये प्रति 10 ग्रॅम, 20 कॅरेट सोन्याचा दर 1,29,020 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा दर 1,17,430 रुपये तर 14 कॅरेट सोन्याचा दर 93,510 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांचा बदलता कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरांमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र सध्या दरात झालेली घसरण पाहता दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील परिस्थितीचा अभ्यास करणे आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये पुढील काळात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news