Gold-Silver Price Crash: चांदी एका दिवसात १ लाखानं उतरली तर सोन्याच्या दरालाही लागली मोठी उतरती कळा

Gold Silver Today Rate: रेकॉर्ड ब्रेक किंमतीला पोहचल्यानंतर सोन्या चांदीच्या दरात एका दिवसातच मोठी घसरण
Gold-Silver Price Crash
Gold-Silver Price Crashpudhari photo
Published on
Updated on

Gold-Silver Price Crash: गेल्या अनेक दिवसांपासून सोने अन् चांदी यांच्या किंमतीचा आलेख हा अत्यंत चढा होता. चांदी तर चार लाखाला टेकली होती. सोने देखील २ लाखाच्या जावळ जाते का अशी चर्चा सुरू असतानाच एका दिवसातच चांदीच्या दरात तब्बल १ लाख रूपयांची घसरण झाली आहे. तर सोने दरात देखील मोठी घसरण झाली आहे. प्रती १० तोळे सोन्याच्या दरात एका झटक्यात ३३ हजार रूपयांची घसरण झाली आहे.

ही घसरण फक्त वायदे बाजारात नसून स्थानिक बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जाणकारांच्या मते रेकॉर्ड ब्रेक किंमतीला पोहचलेली सोन्या चांदीचे दरात मोठी घसरण होण्याची शक्यता होती. या शक्यतेनुसारच ही घसरण झाली आहे.

Gold-Silver Price Crash
Gold Loan: सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर, पण आता गोल्ड लोन घेतल्यावर मिळणार कमी पैसे, असं का?

काय आहेत कारणे?

जाणकारांच्या मते चांदीच्या दराचा हा फुगा फुटणार होता. त्यांचे मत खरे ठरले. फक्त एका दिवसात चांदी १ लाखानं स्वस्त झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गुरूवारी चांदीच्या दरात तुफानी वाढ झाली होती. त्यानंतर चांदीचा दर ३ लाख ९९ हजार ८९३ रूपयांपर्यंत पोहचली होती.

शुक्रवारी वायदा बाजार बंद झाल्यावर ५ मार्चची एक्सपायरी असलेल्या चांदीचा दर क्रॅश झाला. वेगाने हा दर खाली येत प्रती किलो २ लाख ९१ हजार ९२२ रूपयांपर्यंत पोहचला. म्हणजे एका झटक्यात चांदीचे दर प्रती किलो १ लाख ०७ हजार ९७१ रूपयांनी कमी झाले.

Gold-Silver Price Crash
Gold Silver price | चांदीची ऐतिहासिक घसरण 42 हजारांनी स्वस्त

फक्त एका दिवसात गटांगळी

एक दिवस आधीच म्हणजे गुरूवारी चांदीच्या दराने सर्व ऐतिहासिक रेकॉर्ड मोडले होते. चांदी पहिल्यांदाच प्रती किलो ४ लाखाच्या पार पोहचली होती. हा दर ४ लाख २० हजार ४८ रूपयांपर्यंत वधारला होता. मात्र या उच्च किंमतीनंतर चांदीचे दर अचानक वेगाने खाली येऊ लागले. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला. उच्च पातळीवरून चांदी जवळपास १ लाख २८ हजार १२६ रूपयांपर्यंत खाली आली. हे दर फक्त एक दिवसात खाली आले आहेत.

Gold-Silver Price Crash
Gold Silver rates | 44 हजारांच्या उसळीने चांदी 4 लाख पार; सोनेही 2 लाखांकडे

सोन्याच्या दरालाही उतरती कळा

फक्त चांदीच नाही तर सोन्याच्या किंमतीला मिळालेली झळाळी देखील झटक्यात कमी झाली. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर फक्त एका दिवसात ३३ हजार ११३ रूपयांनी कमी झाले. चांदीचे दर आपटल्यानंतर सोन्याच्या दराला देखील उतरती कळा लागली. एमसीएक्सवर २ एप्रिलची एक्सपायरी डेट असलेल्या सोन्याचे वायदे भाव गुरूवारी हे १ लाख ८३ हजार ९६२ रूपये प्रती १० ग्रॅम होते. तर शुक्रवारी यात घट होऊन १० ग्रॅमचे दर हे १ लाख ५० हजार ८४९ रूपयांपर्यंत खाली आले आहेत.

अचानक घसरण का?

जाणकारांनी या घसरणीबाबत आधीच संकेत दिले होते. यामागे एक नाही तर अनेक कारणे आहेत. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण होण्यामागे नफा मिळवण्याचा हेतू हे मुख्य कारण आहे. सोनं आणि चांदी ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर पोहचल्यानंतर प्रॉफिट बुकिंग सुरू झालं. अनेकांनी मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यास सुरूवात केल्यामुळे सोन्या चांदीचे दर झपाट्याने कमी यायला सुरूवात झाली.

फक्त सोने चांदी नाही तर त्यांचे इटीएफ देखील कोसळताना दिसत आहेत. याचबरोबर सोन्या चांदीच्या दरात घट होण्यामागे डॉलर मजबूत होण्याचं देखील एक कारण आहे. ज्यावेळी युएस डॉलर मजबूत होतो त्यावेळी सोन्या चांदीचे दर कमी होतात. कारण दुसऱ्या देशांना सोने आणि चांदीत गुंतवणूक करणं महाग पडतं. त्यामुळं मागणी घटते. त्यामुळं किंमती कमी होतात.

US फॅक्टर्स

डॉलर सोबतच US Treasury यील्डमध्ये देखील वाढ आणि गुंतवणूकदारांना सुरक्षित बाँडमध्ये जास्त रिटर्न दिसू लागले आहेत. त्यामुळे सोन्या चांदीत विक्रीचा ट्रेंड दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांमुळे जागतिक तणाव देखील कमी झाली आहे. US Fed मध्ये जेरॉम पॉवेल यांच्या जारी त्यांच्या पसंतीचे केविन वॉर्श यांची एन्ट्री हा देखील एक फॅक्टर सोने चांदीच्या किंमतीवर दबाव वाढवणारा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news