

Gold Rate Today: देशभरात आज म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, पुणे, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही सोनं महागलं आहे. दरम्यान, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीचे संकेत मिळाल्याने आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.
दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,25,980 प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. तर 22 कॅरेट सोनं ₹1,15,510 प्रति 10 ग्रॅम या दराने विकलं जात आहे.
या तिन्ही महानगरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,15,360 प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,25,850 प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोनं ₹1,25,880 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोनं ₹1,15,410 प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जात आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर स्टीफन मिरान यांनी वाढती बेरोजगारी आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरात 0.50% कपातीचे संकेत दिले आहेत. तसेच अमेरिकेतील शटडाउन संकट कमी होणे आणि डिसेंबरमध्ये दरकपातीच्या अपेक्षा वाढणे, या सर्व गोष्टींमुळे सोने आणि चांदी या दोन्हींच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.
सोनेच नव्हे, तर चांदीतही आज चांगली तेजी दिसून आली आहे. 12 नोव्हेंबर रोजी चांदी ₹1,60,100 प्रति किलो दराने व्यवहारात आहे. विशेष म्हणजे, सोनं आणि चांदीच्या भारतीय दरांवर देशांतर्गत घटकांबरोबर जागतिक आर्थिक वातावरणाचाही परिणाम होतो.
गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थेने डिसेंबर 2026 पर्यंत सोन्याचा भाव $ 4,900 प्रति औंसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर ANZ बँकने पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सोने $ 4,600 प्रति औंसपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज मांडला आहे.